Sapna Choudhary video viral Esakal
मनोरंजन

Sapna Choudhary: फॅन म्हणावा की भक्त ? सपना चौधरीचे पाय धुवून प्यायला पाणी! व्हिडिओ तुफान व्हायरल..

Vaishali Patil

हरियाणवी डान्सर आणि गायिका सपना चौधरी जिने तिच्या करिअरची सुरुवात हरियाणाच्या ऑर्केस्ट्रापासून केली. त्यानंतर तिने स्टेज डान्स करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे याच डान्सच्या जोरावर ती आज लोकप्रिय झाली असून तिने ‘बिग बॉस ११’ मध्ये सहभागही घेतला होता.

आता तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिचा चाहता वर्ग खुप तगडा आहे. ती कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे चर्चेत असायची. एका लहानशा गावातून आलेल्या सपनाने कलाविश्वात १५ वर्षाहून अधिक काळ पुर्ण केला आहे.

दरम्यान सपना आता पुन्हा चर्चेत आली आहे. त्याच कारणही तसचं काहीस आहे. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. हे काही वेगळ सांगायची गरज नाही. सपनाचे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम व्यक्त करतांना दिसतात. त्याचबरोबर सपनाचे चाहते तिला देवाचा दर्जा देतात हेही अनेकदा दिसलं आहे.

आता सपना चौधरीच्या स्टेज शोचा एक जुना व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप वेगानं व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सपनाचे पाय धुतांना दिसला.

या व्हिडिओ कुठल्यातरी कार्यक्रमाचा आहे. ज्यात सपना स्टेजवर बसलेली असून दोन लोक तिचे पाय धुताना दिसत आहेत. या व्यक्तीने प्लेटमध्ये गुलाबाची पाने पसरवली. त्यानंतर त्याने पाण्याची बाटली घेतली आणि तिचे पाय धुण्यास सुरुवात केली. सपनाच्या चेहऱ्यावर एक मोठं हसूही पाहायला मिळत आहे.

सपना इतकी आनंदी दिसत आहे की तिला पाहून नक्कीच असं वाटतं की ती स्वतःही चाहत्यांच्या प्रेमाने आश्चर्यचकित झाली आहे. यानंतर तो व्यक्ती स्टेजवर सर्वांसमोर सपनाचे पाय धुतलेलं तेच पाणी पितो आणि स्वतःवर ओततो.

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला आहे, त्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक लोक या व्हिडिओवर टिका करत आहेत. खुपच विचित्र कृत्य असून सपनाने त्या व्यक्तीला थांबवायला हवं होत अशी कमेंट नेटकरी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT