Sara Ali Khan watched movie Zara Hatke Zara Bachke with Mother And Brother Esakal
मनोरंजन

Zara Hatke Zara Bachke साराला पडद्यावर पाहताना 'त्या' सीनला आवरले नाहीत आई अन् भावाचे अश्रू..अभिनेत्रीनेच केला खुलासा

सारा अली खाननं 'जरा हटके जरा बचके' सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता सर्वसामान्य प्रेक्षकांसोबत बसून सिनेमा पाहण्याचा आनंद लूटला.

प्रणाली मोरे

Zara Hatke Zara Bachke: सारा अली खान आणि विक्की कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात सिनेमानं दणक्यात कमाई केली, पहिल्या तीन दिवसांत सिनेमानं २० करोडहून अधिक कमाई केली आहे.

प्रेक्षकांकडून सिनेमाला मिळणारा प्रतिसाद आणि प्रशंसा पाहता सारा अली खान आपली आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खान सोबत स्वतः सिनेमा पहायला थिएटरमध्ये पोहोचली. सर्वसामान्या लोकांसोबत सारानं सिनेमा पाहण्याचा आनंद लुटला पण यादरम्यान असं काही घडलं की साराची आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खान रडू लागले.(Sara Ali Khan watched movie Zara Hatke Zara Bachke with Mother And Brother)

सारा अली खाननं याचा खुलासा करत म्हटलं की,'' मी आभारी आहे की माझा भाऊ आणि आई सिनेमा पाहताना खूप हसले आणि क्लायमॅक्सला मात्र भरपूर रडले. त्यांना माझा अभिमान आहे..माझ्यावर गर्व आहे''.

सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहताना सारा अली खाननं सांगितलं की,'' मी स्वतःला मोठ्या पडद्यावर मिस करत होती. मला लोकांनी प्रेम दिलं त्यामुळे मी खूश आहे आणि खूप उत्साही देखील आहे''.

या सिनेमात काम करण्याविषयी सारा म्हणाली, ''मला वाटत आहे हा माझा पदार्पणातला सिनेमा आहे. मला खूप काही शिकायला मिळालं हा सिनेमा करताना आणि पुढे जाण्याची एक संधी या सिनेमानं मिळवून दिली''.

तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 'जरा हटके जरा बचके' एक फॅमिली ड्रामा आहे. ज्याचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. दिनेश विजान यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात कॉमेडी आहे.ड्रामा आहे आणि इमोशन्स आहेत जे लोकांना आवडत आहे.

रिलीजनंतर तीन दिवसांत सिनेमानं २२.५९ करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. सिनेमात राकेश बेदी,इनामुलहक,सुष्मिता मुखर्जी आणि आकाश खुरानी सारखे कलाकार देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

Prithviraj Chavan on PM Modi : देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

जमलं तर थोडीशी जमीन घ्या... स्वतःच्या जमिनीवर डाळ तांदूळ पिकवून खातेय लोकप्रिय अभिनेत्री; म्हणते- इतका फरक...

Marathi News Live Updates : राहुल गांधींचा पोलीस ठाण्यात ठिय्या; जंतर-मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीवर एफआयआरची मागणी

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

SCROLL FOR NEXT