satyaki savarkar said this veer savarkar secret files web series answered to opposition cast saurabh gokhale as main roll sakal
मनोरंजन

Veer Savarkar Jayanti: विरोधकांच्या टिकेला हेच खरं उत्तर असेल.. सावरकरांचे नातू भडकले..

सावरकरांवरील वेबसिरिजच्या निमित्ताने ते बोलत होते.

नीलेश अडसूळ

Veer Savarkar Jayanti: देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे एक थोर क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांचे कार्य, हिंदुत्वाप्रती असलेली आस्था, मराठी वरील प्रेम आणि देश सेवेसाठी दिलेले योगदान प्रचंड मोठे आहे.

पान सावरकर हे कॉँग्रेस विरोधी आणि गांधी विरोधी असल्याने त्यांच्यावर कायमच गांधी वादी समूहाकडून टीका होत आली आहे. गांधींची अहिंसावादी होते तर सावरकर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी साम, दाम, दंड भेद सर्वकाही कामी आणावं या विचाराचे होते.

त्यामुळे आज हे दोन महापुरुष नसले तरी त्यांच्या नावाने केल्या जाणाऱ्या टीका मात्र संपलेल्या नाहीत. आजही सावरकरांवर टीका होत आहे. पण याच संदर्भात सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी महत्वाचे विधान केले आहे.

(satyaki savarkar said this veer savarkar secret files web series answered to opposition cast saurabh gokhale as main roll)

सावरकर यांच्या जीवनावर एक हिंदी वेबसीरिज 'वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स...' लवकरच येणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली. यावेळी सात्यकी सावरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या वेबसीरिजमध्ये मराठी अभिनेता सौरभ गोखले सावरकरांची मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचा लूकही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच सावरकरांवर आजवर ज्या टीका झाल्या, त्याबाबतही यावर भाष्य करण्यात आल्याच समजते.

या कार्यक्रमात सात्यकी सावरकर म्हणाले, 'स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारकांना दिलेली प्रेरणा, एखाद्या विषयाबद्दल सावरकर यांची भूमिका काय होती, त्यांचा त्याग, बलिदान हे सर्व मांडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.''

''वेबसीरिजच्या माध्यमातून ही भूमिका मांडण्याचे काम केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सावरकर यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून टीकेला उत्तर दिले जाणारच आहे. परंतु, टीकेला उत्तर म्हणून काही बनवण्यापेक्षा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले स्वातंत्र्यवीर प्रेक्षकांसमोर आले पाहिजेत.' असे ते म्हणाले.

एवढेच नाही तर ही वेबसिरिज कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nita Ambani Junior School News : ‘नीता अंबानी ज्युनियर स्कूल’मध्ये प्रवेशाचे आमिष दाखवून पालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

MLA Ashutosh Kale: अवैध धंद्यांच्या बीमोडासाठी रस्त्यावर उतरू : आमदार आशुतोष काळे यांचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

Amruta Fadnavis : उद्धव ठाकरे 'शोले'मधील जेलर तर शरद पवार... अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांना दिल्या 'या'उपमा

Deola Accident : देवळा-कळवण रस्त्यावर भीषण अपघात; सासू–सून ठार, दोन चिमुकले गंभीर

IND vs SA 2nd ODI: 'तुझं डोकं लावू नकोस, मी सांगतोय तसं कर...' KL Rahul संतापला, प्रसिद्ध कृष्णाला धारेवर धरले, Video Viral

SCROLL FOR NEXT