Satyaprem Ki Katha Song Budget Esakal
मनोरंजन

Satyaprem Ki Katha: कियाराच्या मानधनापेक्षा कार्तिकच्या एका गाण्यावर खर्च झालाय पाण्यासारखा पैसा..आकडा ऐकाल तर..

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या 'सत्यप्रेम की कथा' सिनेमाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्रणाली मोरे

Satyaprem Ki Katha: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी पडद्यावर एकत्र दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. दोघं लवकरच 'सत्यप्रेम की कथा' सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाची लोक चातकासारखी वाट पाहत आहेत. काही दिवस आधीच कार्तिकनं या सिनेमाचं शूट पूर्ण केलं.(Satyaprem Ki Katha Kartik Aaryan And Kiara advani film song budget)

सत्यप्रेम की कथा सिनेमाचं शूट एका गाण्याच्या शूटिंगसोबत संपलं. आता त्यासंदर्भात कळत आहे की ज्या गाण्याच्या शूटिंगनं सिनेमाचं शूट संपलं त्या गाण्यावर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. तो खर्चाचा आकडा ऐकाल तर तुम्हाला झटका लागेल यात शंकाच नाही.

रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे की निर्मात्यांनी फक्त एका गाण्यावर ७ करोड खर्च केले आहेत. हे गाणं एक इंट्रोडक्टरी गाणं असणार आहे,जे एका वेडिंग थीमवर आधारित आहे. बोललं जात आहे की गाण्यात गुजराती,साऊथ इंडियन,मुस्लिम आणि ईसाई पद्धतीनं लग्न दाखवलं जाणार आहे. या गाण्याच्या शूटिंगसाठी चार वेगवेगळे वेडिंग सेट उभारण्यात आले होते.

बोललं जात आहे की कार्तिक आर्यनच्या सांगण्यावरनं निर्मात्यांनी एका गाण्यावर इतका पैसा खर्च केला आहे. माहितीसाठी इथं सांगतो की या गाण्यासाठी जेवढे पैसे निर्मात्यांनी खर्च केलेत तितकं कियारा अडवाणीला सिनेमासाठी म्हणे मानधन मिळालं आहे. किंबहुना त्याहून कमी मानधन तिला मिळालंय असं देखील समोर आलं आहे.

रिपोर्ट्सनुसार कियाराला ४ करोड मानधन मिळालं आहे, आणि कार्तिक आर्यनला म्हणे २५ करोड फी सिनेमासाठी मिळाली आहे.

गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'भूलभूलैय्या २' नंतर कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. 'सत्यप्रेम की कथा' सिनेमा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे, हा सिनेमा २९ जून रोजी सिनेमागृहात भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

NMMC Election: गणेश नाईक पार्टीविरोधात शिवसेनेची लढाई, जाहीरनामा प्रकाशनावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

Pimpri News : भारतीय तरुणाला कंबोडियात बनवले ‘सायबर स्लेव्ह’; तब्बल चार महिने खोलीत डांबले

Education News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एमएचटी-सीईटी, एमबीए-सीईटीला नोंदणी आजपासून सुरू; 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT