Shah Rukh Khan and Deepika Padukone photos leak from the set of 'jawan' Esakal
मनोरंजन

Jawan च्या सेटवरनं लीक झाला शाहरुख-दीपिकाचा फोटो.. दोघांना पाहून पुन्हा मात्र आठवेल 'बेशरम रंग'

'जवान' सिनेमाती एक गाणं दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानवर नुकतंच चित्रित करण्यात आलं.

प्रणाली मोरे

Jawan Movie: 'पठाण' नंतर शाहरुख खान लवकरच 'जवान' सिनेमात दिसणार आहे. त्याच्या सिनेमाचं शूटिंग सध्या वेगानं सुरु आहे. खास गोष्ट ही आहे की,'जवान' सिनेमात शाहरुख खान बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणसोबतही दिसणार आहे.

अर्थात आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की 'जवान' सिनेमात साऊथ अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे दीपिका एक छोटासा कॅमियो साकारताना दिसणार आहे.

नुकताच जवानच्या सेटवरनं दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानचे काही फोटो लीक झाले आहेत. ज्यामध्ये दोन्ही कलाकार खास आणि वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. (Shah Rukh Khan and Deepika Padukone photos leak from the set of jawan)

दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानचा हा फोटो किंग खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये दोन्ही कलाकार एकसारखे ड्रेस घालून दिसत आहेत. फोटोत दीपिका पदूकोण आणि शाहरुख खाननं व्हाइट शर्ट सोबत ब्लॅक पॅंट घातली आहे.

सोबत हातात लाल रंगाचा कोट पकडला आहे आणि गळ्यात जाडसर रशी दिसत आहे. फोटोत दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानचा अंदाज पाहून 'बेशरम रंग'चं गाणं आठवेल. (Entertainment News in Marathi)

सोशल मीडियावर दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानचे फोटो वेगानं व्हायरल होताना दिसत आहेत. शाहरुख-दीपिकाच्या चाहत्यांना हे फोटो फारच आवडले आहेत. लोक यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

तुम्हाला माहितीसाठी इथे सांगतो की 'जवान' सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण व्यतिरिक्त नयनतारा,विजय सेतुपति,संजय दत्त आणि सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 'जवान' सिनेमा २ जून रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिंदी,तामिळ,तेलुगु,मल्याळम,कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT