Shah Rukh Khan, Gauri Khan Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: मन्नत बंगला खेरदी करून कंगाल झालेला शाहरुख..रातोरात पत्नी गौरी खानला घ्यावा लागला होता 'हा' निर्णय

गौरी खाननं आपल्या पुस्तकात आयुष्यातील या कठीण प्रसंगाचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Shah Rukh Khan आज जगातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. आज वयाच्या ५७ व्या वर्षीही त्याचं हिरो बनणं लोकांना आवडतं आणि अजूनही त्याचे सिनेमा १००० कोटींचा गल्ला जमावण्याची क्षमता ठेवून आहेत. गेल्या ३ दशकात शाहरुखचा जलवा अगदी आहे तसाच आहे. पण आज त्याच्या दमदार करिअर विषयी आपण बोलायचं नाहीय तर त्याच्या पडत्या काळावर एक नजर टाकूया..

जेव्हा तो बाबा बनणार होता आणि त्या खुशीत त्यानं करोडोंचा मन्नत बंगला खरेदी केला होता त्यावेळी मोठं संकट त्याच्यावर आलं होतं. अर्थात त्यानं ही अडचण स्वतःहूनच ओढवून घेतली होती. (Shahrukh Khan face financial crises after buying Mannat when Gauri khan was pregnant)

जेव्हा शाहरुख आणि गौरी त्यांचे पहिले अपत्य आर्यन खानला जन्म देण्याच्या तयारीच होते तेव्हा ते आपल्यासाठी नव्या घराच्या शोधात होते. दोघांचंही 'मन्नत'वर एकमत झालं कारण तो बंगला पाहताच त्यांच्या मनात बसला.

अर्थात तेव्हा तो शाहरुखच्या बजेटच्या बाहेर होता पण तरिदेखील त्यानं तो खरेदी केला आणि त्यानंतर शाहरुखची आर्थिक परिस्थिती पूर्ण डबघाईला आली. अगदी अशी अवस्था शाहरुखची झाली होती की एक सोफा देखील खरेदी करताना त्याला विचार करावा लागला होता.

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Mannat Bungalow

गौरी खाननं आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे की ते दोघे मन्नत खरेदी केल्यानंतर जेव्हा सोफा खरेदी करायला गेले होते तेव्हा तो सोफा त्यांना खूपच महाग वाटला होता आणि ते खरेदी करू शकले नव्हते.

तेव्हा गोरींन त्या सोफ्याचं डीझाईन कागदावर रेखाटलं आणि लेदर खरेदी करून ते शिवून घेतलं. त्यानंतर फक्त पैशाची कमतरता आणि तेव्हाची गरज म्हणून गोरीनं स्वतः घर डिझाईन करण्याचा निर्णय घेतला. आणि दोघांनी निर्णय घेतला की एक-एक वस्तू घरासाठी खरेदी करायची म्हणजे काहीच डोईजड होणार नाही.

पण खरंतर त्यावेळच्या गरजेमुळे मजबूरीतच गौरीनं इंटेरिअरचं सुरु केलेलं काम तिचं करिअर बनलं आणि आता तेच तिचं पॅशन आहे.नवरा बक्कळ कमाई करत असतानाही गौरीनं आपलं काम सोडलं नाही. आज गौरी खान प्रसिद्ध डिझाइनर आहे..जी मोठमोठ्या सेलिब्रिटींची घरं डिझाइन करते. गौरीनं मन्नतचा तर संपूर्ण लूकच गेल्या काही वर्षात बदलून टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT