Shekhar Suman on Kangana Ranaut and Adhyayan Suman Relation Esakal
मनोरंजन

Shekhar Suman: 'का तुटलं कंगनाचं अध्ययन सुमनशी नातं?', शेखर सुमन खुलासा करत म्हणाले, 'चूक तिची नव्हती तर ..'

२००८ मध्ये आलेल्या 'राज: द मिस्ट्री कंटीन्यूज' सिनेमाच्या शूट दरम्यान कंगना रनौत आणि अध्ययन सुमन यांच्यात जवळीक वाढली होती.

प्रणाली मोरे

Shekhar Suman: बॉलीवूड अभिनेता शेखर सुमन आपल्या दमदार अभिनयासाठी आणि उत्तम कॉमेडी टायमिंगसाठी ओळखले जातात. नुकतंच एका मुलाखतीत शेखर सुमननं आपला मुलगा अध्ययन सुमन आणि अभिनेत्री कंगना रनौत विषयी भाष्य केलं आहे. शेखर सुमन म्हणाले की अध्ययन सुमन आणि कंगनाचं नातं तुटण्यामागे त्यावेळची परिस्थिती कारण ठरली. यामध्ये कंगनाची काही चूक नव्हती असं देखील शेखर सुमन यांनी स्पष्ट केलं.

एक काळ होता जेव्हा कंगना रनौत आणि अध्ययन सुमन हे रिलेशनशीपमध्ये होते. दोघांमध्ये खूप जवळचं नातं होतं, पण कंगना आणि हृतिक रोशनमध्ये वाद सुरु झाला तेव्हा अध्ययन सुमननं कंगनाविरोधात खूप वादग्रस्त विधानं केली होती.

अध्ययन सुमन म्हणाला होता की, कंगनानं त्याच्यावर ब्लॅक मॅजिक केलं होतं. अभिनेत्यानं हे असं वक्तव्य करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.(Shekhar Suman on Kangana Ranaut and Adhyayan Suman Relatio)

आता शेखर सुमननं कंगना रनौतसोबतच्या अध्ययन सुमनच्या नात्यावर चुप्पी तोडली आहे आणि आपण त्या दोघांच्या नात्याविरोधात कधीच नव्हतो असा खुलासा केला आहे. शेखर सुमन म्हणाले की,''आयुष्यात खूप वेगवेगळ्या फेज येतात. अनेकदा तुम्ही तुमच्या पहिल्या नात्यात यशस्वी होऊन जाता पण अनेकदा तुम्हाला तसं यश मिळत नाही. आता प्रत्येकालाच आपलं पहिलं प्रेम कायम टिकावं असं वाटत असतं पण अनेकदा आजुबाजूच्या लोकांना किंवा मित्रांना तुमचं ते नातं टिकू नये असं वाटत असतं''.

शेखर सुमनला जेव्हा विचारलं गेलं की, 'अध्ययन सुमनचं नातं तुटलं याचा दोष ते कुणाला देतात?' तेव्हा ते म्हणाले की, ''यामध्ये कंगनाची काहीच चुकी नव्हती. पण परिस्थितीच अशी निर्माण झाली जिच्यापुढे प्रेमानं हात टेकले. कोणतंही नातं एका चांगल्या नोटवर संपायला हवं. आणि अध्ययननं चुकून असं काही बोललं असेल तर त्याविषयी त्यानं माफी मागितली आहे, त्यानं कोणाविषयी मनात राग ठेवायला नको''.

कंगना रनौत ही बॉलीवूडची सगळ्यात वादग्रस्त अभिनेत्री आहे. तिनं केलेली बेताल वक्तव्य नेहमीच फिल्म इंडस्ट्रीला हादरवून सोडतात.कंगना आणि अध्ययन सुमननं २००८ मध्ये आलेल्या 'राज: द मिस्ट्री कंटीन्यूज' मध्ये स्क्रीन शेअर केली होती. शूटिंगच्या दरम्यान अध्ययन आणि कंगनामध्ये जवळीकता वाढली. अर्थात त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. आणि काही दिवसांतच दोघे वेगळे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT