Shraddha Kapoor Shared Photos with Lata Mangeshkar sakal
मनोरंजन

Lata Mangeshkar: आजींसाठी श्रद्धा कपूरची भावनिक पोस्ट!

Shraddha Kapoor Shared Photo with Lata Mangeshkar: लतादींदीची आठवण काढत श्रद्धा कपूरने त्यांच्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिग्गज गायिका लतादीदींच्या (Lata Mangeshkar) निधनानंतर बॉलीवूडवर (Bollywood) शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) लतादीदींसोबतचे काही फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला. लतादीदींबद्दल श्रद्धा लिहिते की, "तुमच्याबरोबर घालवलेले मौल्यवान क्षण कायम स्मरणात राहतील. माझ्या डोक्यावरील तुमचा हात, तुमची प्रेमळ नजर आणि प्रोत्साहन देणारे तुमचे मायेचे शब्द, तुमचा साधेपणा, श्रेष्ठता आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. तुम्ही महान आहात! लव्ह यू लता आजी." आपल्या भावना व्यक्त करताना श्रद्धाने लतादीदींचे काही 'थ्रोबॅक फोटोज' देखील शेअर केले. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्याबद्दल भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत.

Lata Mangeshkar

श्रद्धा कपूरचे आजोबा, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे चुलत भाऊ आहेत. म्हणजेच श्रद्धाची आई शिवांगी (Shivangi Kapoor) कपूर लतादीदींची भाची आहे. त्यामुळे श्रद्धा त्यांची नात्याने नात लागते. लतादीदींच्या निधनाच्या एक दिवस आधी श्रद्धाने त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट दिली होती.

वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर श्रद्धा आता लव्ह रंजनच्या (Luv Ranjan) चित्रपटात रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बोनी कपूर (Boney Kapoor) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय, 'चालबाज इन लंडन' आणि 'नागिन' यातही ती झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election 2025 : पुण्यात मविआचं जागावाटप ठरलं, ठाकरेंच्या जागांमध्ये मनसेला वाटा; शरद पवारांच्या शिलेदारानं दिली माहिती

विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात 12 हजार झाडांची कत्तल सुरू; पर्यावरणप्रेमी गप्पच, 8 हेक्टर क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम!

IND vs NZ ODI Series: ऋतुराज गायकवाड IN; हार्दिक, जसप्रीत बुमराह OUT! भारताचा किवींविरुद्ध वन डे मालिकेसाठीचा संभाव्य संघ

Google Search : 2025 वर्षांत गुगलवर सर्च झाल्या 'या' 10 अत्यंत भयानक गोष्टी; धक्कादायक माहिती बाहेर आल्याने जग हादरलंय

CBSE KVS and NVS Recruitment 2025: सीबीएसईने केव्हीएस आणि एनव्हीएस भरती २०२५ टियर-१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'असे' करा सिटी स्लिप आणि अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड

SCROLL FOR NEXT