Fabulous Lives Of Bollywood Season 2 च्या पहिल्या भागात सीमा सजदेहने सोहेल खानशी(Sohail Khan) घटस्फोट(Divorce) आणि त्यासंबधित काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये फॅशन डिझाईनर सीमा सजदेह बोलताना दिसत आहे की, सोहेल खानशी घटस्फोट घेतल्यानंतर तिनं आपल्या नेमप्लेटवरुन 'खान' आडनाव हटवलं ते मोठ्या मुलाला खटकलं. तिनं फक्त त्यावर सीमा,निर्वाण,योहान असं लिहिलेलं मोठ्या मुलाला आवडलं नाही. आईच्या या निर्णयाच्या तो विरोधात होता हे यावरनं स्पष्ट दिसत आहे.(Son Nirvaan gets upset after mom Seema Sajdeh removes 'Khan' from her nameplate)
सीमा सजदेह-सोहेल खानचा मुलगा निर्वाण आईला म्हणाला,''आपण चौघं कुटुंब आहोत,खान कुटुंब. पण तू 'खान' आडनाव नेमप्लेटवरनं काढून आपल्या तिघांची नावं ठेवलीस,यामागे तुला त्या एका व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काढायचं होतं. ज्याची गरज खरंतर मुळीच नव्हती. काय फरक पडला त्याने? शेवटी आपण खानच राहणार,आणि आपण खानच आहोत''.
त्यानंतर सीमा सजदेहनं आपण सोहेल खानला घटस्फोट का दिला याविषयी देखील मन मोकळं केलं. तिनं या शो मध्ये स्पष्ट केलं आता ती खान राहिली नाही. सीमा पुढे म्हणाली,''जेव्हा निर्वाणनं मला विचारलं की तू 'खान' आडनाव नेमप्लेट वरनं का काढलंस? तेव्हा मी त्याला म्हटलं,मी आता ते नाव कसं वापरू शकते? आणि तुम्हाला सजदेह आडनाव तुमच्या नावापुढं लावा असं सांगू शकत नाही, म्हणून मी फक्त आपल्या तिघांची नावं तिथं लिहिली. तू म्हणतोयस आपण कुटुंब आहोत, राहू हे मला मान्य आहे,पण तरीही आता माझ्या आयुष्यात मी पुढे निघून गेलेय. आणि ते गरजेचं होतं''.
सीमा सजदेह याविषयी बोलताना मुलाला पुढे म्हणाली,''मी सद्य परिस्थितीत कुणीच नाही. ना सजदेह,ना खान. पण तू आणि तुझा धाकटा भाऊ योहानसोबत खान नाव कायम राहिल,जे माझ्यासोबत राहणार नाही. मला आता माझ्या नावापुढे कोणत्याच नावाची गरज भासत नाही''.
सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. तब्बल २४ वर्षाचा संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मे २०२२ मध्ये सोहेल खान आणि सीमा सजदेहनं कोर्टांत घटस्फोटाची केस फाइल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.