मनोरंजन

तीन दिवसांत '100 कोटी'! 'स्पायडर मॅननं' रचला इतिहास

कोरोनामुळे दोन वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रावर काही मर्यादा होती. त्याचा परिणामही अनेक चित्रपटांवर झाला.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनामुळे दोन वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रावर काही मर्यादा होती. त्याचा परिणामही अनेक चित्रपटांवर झाला. यामुळे निर्माते, दिग्दर्शक अडचणीत सापडले होते. त्यांच्यापुढे समस्या झाली होती. मात्र गेल्य़ा काही दिवसांपासून परिस्थिती बदलली आहे. नव्यानं प्रदर्शित झालेल्या काही हॉलीवूड (hollywood) पटांनी चित्रच पालटून टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी काही अॅक्शनपट प्रदर्शित झाले होते. त्यामध्ये इटर्नलचाही (iternal) समावेश होता. त्यानही चांगली कमाई केली होती. मात्र साधारण चार दिवसांपूर्वी स्पायडर मॅनच्या सीरिजमधील शेवटचा स्पायडर मॅन नो वे होम (spider man no way home) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि त्यानं इतिहास निर्माण केला आहे. (Sony Pictures Entertainment India Creates History)

स्पायडर मॅनच्या(spider man no way home) या चित्रपटानं तीन दिवसांत चक्क शंभर कोटी रुपये कमावले आहे. आतापर्यत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे. अशी कामगिरी करणारा सोनी प्रॉडक्शनचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जगभरातून स्पायडर मॅनवर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. स्पायडर मॅनच्या यापूर्वीच्या भागांना देखील प्रेक्षकांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स यांनी पुरेपूर भरलेल्या स्पायडर मॅनच्या सीरिजमधील शेवटचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो पाहण्यासाठी ज्येष्ठांपासून लहानांपर्यत सर्वांनीच गर्दी केल्याचे दिसून आले आहे.

जेव्हा स्पायडर मॅन नो वे होम प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्वात मोठा बिझनेस केल्याचे दिसून आले. यापूर्वी कोणत्याही चित्रपटाला असा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, ‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ चित्रपटाच्या कमाईने पहिल्या दिवशी ३५ कोटींचा आकडा पार केला होता. तर आता तिसऱ्या दिवशी शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. शुक्रवारच्या तुलनेत चक्क 30 टक्क्यांची वाढ या चित्रपटाला मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्सच्या वतीनं करण्यात आली आहे. गुरुवारी या चित्रपटानं 41.50 कोटी, शुक्रवारी 25.67 कोटी आणि शनिवारी 33.67 कोटींचा व्यवसाय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT