Adipurush Movie Controversy Esakal
मनोरंजन

Adipurush: 'हा राम कमी अन् महाभारतातला कर्ण', अभिनेत्रीनं केली आदिपुरुषमधल्या श्रीरामाच्या लूकवर टिका! नेटकऱ्यांनी झाडलं...

Vaishali Patil

Kasthuri Shankar on Adipurush: प्रभास आणि क्रिती सेनन यांचा चित्रपट आदिपुरुष रिलीजसाठी सज्ज आहे. नुकताच तिरुपती येथे एका शानदार कार्यक्रमादरम्यान चित्रपटाचा फायनल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा फायनल टिझर रिलिज झाल्यानंतर बरेच वाद सुरु झाले आहे.

फायनल ट्रेलर नंतर VFX काही लोकांना फारसा आवडला नाही. त्यातच तिरुपती मंदिरात दिग्दर्शक ओम राऊत यांनी कृती सेनेनला गुडबाय किस केल्याने खळबळ उडाली. सोशल मीडियावर यासंबंधीचे फोटो समोर आले होते, त्यानंतर अनेकांनी दोघांवर जोरदार टीका केली होती.

त्यातच आता चित्रपटातील कलाकारांच्या लूकवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. साऊथ अभिनेत्री कस्तुरी शंकर हिने चित्रपटातील कलाकारांच्या लूकवर निशाणा साधला आहे.

आदिपुरुष मधला प्रभासचा लूक भगवान रामसारखा नसून महाभारतातील कर्णासारखा आहे असं कस्तुरी शंकर हिने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने म्हटलं.

तिने ट्विट केले की, "प्रभू राम आणि लक्ष्मण यांना मिशा दाखविण्याची परंपरा आहे का? असा त्रासदायक देखावा का ठेवला आहे? विशेषत: प्रभासच्या तेलुगू सिनेमात, जिथे ही व्यक्तिरेखा अनेक दिग्गजांनी पूर्ण केली आहे. मला वाटतं प्रभासचा लूक रामसारखा नसून कर्णासारखा आहे.

त्यानंतर कस्तुरीची ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रभासच्या चाहत्यांना तिची पोस्ट मुळीच आवडलेली नाही. त्यांनी कमेंट करत तिला चांगलच सूनावलं आहे.

एकानं लिहिलयं की , 'तुम्ही रामाला प्रत्यक्ष पाहिले आहे का? ज्यावर तुम्ही अशी कमेंट करत आहात.'

तर दुसऱ्याने लिहिले आहे की, दुसर्‍या, 'श्री रामच्या संपूर्ण अवतारात चेहऱ्यावर केस नव्हते, असा कोणताही स्रोत आहे का?'

आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभासशिवाय क्रिती सेनन, सनी सिंग, सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT