Subhodh Bhave Birthday his struggle success story first serial movie drama latest project  sakal
मनोरंजन

Subodh Bhave Birthday: अभिनय जमत नाही म्हणून नाटकातून काढलं होतं सुबोधला आणि आज..

मराठीतील सुपरस्टार म्हणवणाऱ्या अभिनेता सुबोध भावेचा आज वाढदिवस, वाचा त्याची स्ट्रगल स्टोरी..

नीलेश अडसूळ

subodh bhave : मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुबोध आज मराठीतील सुपरस्टार झाला असला तरी त्याच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. मोठा संघर्ष करून तो इथवर पोहोचला आहे. एक काळ असा होता की अभिनय येत नाही म्हणून त्याला नाटकातून काढून टाकले होते. हाच सुबोध आज मनोरंजन विश्वा गाजवतो आहे. आज त्याचा वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याची सक्सेस स्टोरी..

(Subhodh Bhave Birthday his struggle success story first serial movie drama latest project )

मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चरित्र भूमिका साकारणारा असा हा महत्वाचा अभिनेता आहे. आज मराठीमध्ये सुपरस्टार अशी त्याची ख्याती होत आहे. सुबोध नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच माध्यमात शिताफीने काम करतो आहे. अनेक मानाचे पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. अशा आपल्या लाडक्या कलाकाराचा आज वाढदिवस. 9 नोव्हेंबर 1975 रोजी पुण्यात जन्म झालेला सुबोध आज 47 वा वाढदिवस साजरी करत आहे.  

एक वेळ अशी होती की, सुबोधला अभिनय जमत नाही म्हणून नाटकातून काढलं होतं. सुबोध कॉलेजमध्ये असताना बारावीत नापास झाला होता. त्याच्या डोक्यात केवळ नाटकाच वेड होतं. पण कॉलेजमध्ये असताना अभिनय जमत नाही म्हणून त्याला नाटकातून काढून टाकलं होतं. पण त्याने हार मानली नाही. अत्यंत मेहनतीने तो मनोरंजन क्षेत्रात उतरला आणि अभिनयात पुढे गेला.

करिअरच्या सुरुवातीला सुबोधला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मनासारख्या भूमिकाही मिळत नव्हत्या. अशातच तो 'आभाळमाया' मालिकेच्या ऑडिशनला गेला आणि त्याची निवड झाली. पहिल्याच मालिकेच्या माध्यमातून सुबोध घराघरांत पोहोचला. त्यानंतर खऱ्या अर्थाने तो ओळखला जाऊ लागला आणि कामं मिळत गेली. त्याची कुलवधू मालिका आजही प्रेक्षक विसरले नाहीत.

पुढे त्याने 'या गोजिरवाण्या घरात', 'वादळवाट', 'अवघाचि संसार', 'तुला पाहते रे', 'अवंतिका', 'कळत नकळत', 'तुला पाहते रे', 'चंद्र आहे साक्षीला' अशा अनेक मालिका गाजवल्या. सध्या तो 'बस बाई बस' या झी मराठीवरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

आजवर सुबोधने सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपली छाप उमटवली आहे. 'बालगंधर्व', 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लोकमान्य टिळक' अशा अनेक दिग्गजांचे बायोपिक त्याच्या नावावर आहेत. तर 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुबोधने सांभाळली. आज मराठी मनोरंजन विश्वात सुबोधकडे एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT