Sunny Leonie Cannes 2023 Kennedy Actress Green  esakal
मनोरंजन

Cannes 2023 : सनीचा हिरवा गाऊन, घ्या पाहून! कान्समध्ये बहरली हिरवळ

यापूर्वी कान्समधून ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मा, उर्वशी रौतेला, सोनम कपूर, या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. याशिवाय काही अभिनेतेही त्यात सहभागी झाले होते.

युगंधर ताजणे

Kennedy Actress Sunny Leone At Cannes 2023 : जगभरामध्ये सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी अन् चाहत्यांसाठी कान्सचे महत्व काही औरच आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या भारतीय अभिनेत्री यांच्याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. यंदाच्या कान्स महोत्सवातील अभिनेत्रींचे फोटो व्हायरल झाले आहे.

यापूर्वी कान्समधून ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मा, उर्वशी रौतेला, सोनम कपूर, या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. याशिवाय काही अभिनेतेही त्यात सहभागी झाले होते. मात्र यासगळ्यात आता सनीचा व्हायरल झालेला लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी ही तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे चर्चेत आली होती. कान्समध्ये सनीचा व्हायरल झालेला लूक चाहत्यांच वेधून घेतलं आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

सनी पहिल्यांदाच कान्समध्ये डेब्यु करते आहे. त्यामुळे तिच्या फोटोंची अनेकांना उत्सुकता होती. आता तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. सनीचा तो लूक पाहून चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहेत. एकानं सनीचा ग्रीन गाऊन लूक पाहताच तिची स्तूती केली आहे.सनी यात खूपच छान दिसते आहे. असे म्हणत कान्समध्ये तुझा डेब्यु प्रभावी असल्याचे म्हटले आहे. सनी ही तिची फिल्म केनडी या मिडनाईटच्या स्क्रिनिंगसाठी कान्समध्ये आली आहे.

अनुराग कश्यपची केनेडी नावाची फिल्म कान्समध्ये दाखवली जाणार आहे. त्यानिमित्तानं सनी ही कान्सला गेली आहे. यापूर्वी सनीनं ही गोड बातमी चाहत्यांसाठी शेयर केली होती. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. तिनं पहिल्या दिवशी डिझायनर मारिया कोखियानं तयार केलेल्या डिझाईनचा ड्रेस परिधान केला होता.

केनडी विषयी सांगायचे झाल्यास, त्या सनी सोबत राहुल भट्ट नावाचा अभिनेता दिसणार आहे. कान्सच्या मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये हा मुव्ही दाखवण्यात येणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित केनडी ही एकमेव फिल्म आहे जिची निवड प्रीमिअरसाठी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT