Sushant Singh Rajput Birth Anniversary Esakal
मनोरंजन

Sushant Singh Rajput: सुशांतच्या आठवणीत रमली बहिण व्हिडिओ आणि ट्विट करत केलं भावनिक आवाहन

Vaishali Patil

Sushant Singh Rajput Birth Anniversary: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा २१ जानेवारीला वाढदिवस आहे. आज जर सुशांत या जगात असता तर त्याचं कुटुंब आणि चाहत्यांनी त्याच्या 37 वाढदिवस नक्कीच साजरा केला असता. तो या जगात नसला तरी त्याचे चाहते आणि त्यांच कुटुंब त्याचा वाढदिवस साजरा करणार यात काही शंका नाही. त्याच्या निधनाला अडीच वर्षे उलटली तरी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना त्यांचे दु:ख अजूनही आहे.

भावाचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी त्याची बहीण प्रियांका सिंगने चाहत्यांसोबत काही व्हिडिओ शेअर केलेत ज्यात तिने सुशांतसोबतच्या त्याच्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर एक खास आवाहनही केलं आहे.

श्वेताने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्वेता सिंग म्हणते, 'सर्वांना नमस्कार. भावाच्या वाढदिवसापूर्वी, मला भावाशी संबंधित काही आठवणी सांगायच्या आहेत आणि त्याला लहानपणी काय करायला आवडायचे ते मला सांगायचे आहे. आम्हाला घरी गुडिया आणि गुलशन म्हटलं जायचं. आम्हाला जेंव्हा काहीही करायचं असेल तेंव्हा ते आम्ही एकत्र करायचो.' याबरोबरचं तिने काही आठवणीही शेअर केल्या आहेत.

त्याच बरोबर तिने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना सुशांतच्या वाढदिवसानिमित्त डॉग शेल्टरला देणगी देण्याचं आवाहन केले आहे. तिनं लिहिलयं की, सुशांतच्या दिवसासाठी( वाढदिवसासाठी ) तुमचे ड्राफ्ट्स तयार ठेवा. शक्य असल्यास, सुशांत आणि फज (सुशांतचा कुत्रा) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही उद्या डॉग शेल्टरला भेट देऊ शकता. मी सुद्धा तसंच काहीस करणार आहे.

याशिवाय सुशांतच्या बहिणीने तिच्या लग्नाचाही एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि तिचा पती आणि सुशांत दिसत आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, '11 वर्षांपूर्वी या तारखेला तू उपस्थित राहून सिड आणि मला एकत्र आणलं होतं. नेहमीच आमच्यासोबत ... अजूनही वाटते की तू अजूनही आसपास आहेस, माझी सनशाइन. पण ज्याला तू ज्याला त्रिशुल म्हणायचा ते आता तुटलयं'.

नेहमीप्रमाणे सुशांतचे चाहते पुन्हा एकदा भावूक झाले. अनेक चाहत्यांनी सुशांतसाठी प्रार्थना केली तर काहींनी त्याच्या बहिणीचं सांत्वन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९० वर्षांची परंपरा आजही कायम! बैलगाडीतून निघालेली गणपती मिरवणूक ठरली खास, भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा मुंबईच्या चिंचपोकळी रेल्वे स्थानकावर पोहोचला

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT