sushant 
मनोरंजन

...म्हणून सुशांतसिंग राजपूत 'रोमियो अकबर वॉल्टर' या चित्रपटात दिसणार नाही

सकाळवृत्तसेवा

 मुंबई : सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्यावर अन्याय झाल्याच्या अनेक कहाण्या आपल्यासमोर येत आहेत. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. बॉलिवूड

अभिनेता सुशांतसिंग राजपूतला अनेक चित्रपटांतून वगळले जात होते आणि काही वेळा त्याला जबरदस्तीने चित्रपट सोडायला लागत होते आणि नंतर त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला तो चित्रपट मिळत होता. त्याची यादी बरीच लांब आहे. हाफ-गर्लफ्रेंड आणि फितूर या चित्रपटांतही तो काम करणार होता. पण काही कारणास्तव ते चित्रपट तो करू शकला नाही. आता दिग्दर्शक राॅबी ग्रेवाल यांचा रोमियो अकबर वाॅल्टर हा चित्रपट सुशांत निश्चित करणार होता. परंतु शूटिंगचे शेड्युल्ड आणि त्याच्या तारखा जमू न शकल्याने नाईलाजास्तव त्याला हा चित्रपट करता आला नाही. त्याच्या जागी नंतर जाॅन अब्राहमची निवड करण्यात आली.

या  चित्रपटात सुशांत एका गुप्तहेराची भूमिका करणार होता.  त्याची पोस्टर्सही तयार होती. परंतु शेड्युल जमू न शकल्याने सुशांतने हाही चित्रपट करण्यास नकार दिला.  त्यानंतर निर्माता बंटी वालिया आणि दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांना मोठा धक्का बसला.  दोघांनाही बदली कलाकार मिळणे कठीण झाले. जेव्हा सुशांतने या चित्रपटासाठी नकार दिला होता तेव्हा ही भूमिका जॉन अब्राहमला देण्यात आली होती.  यामध्ये मौनी रॉय, जॅकी श्रॉफ आणि सिकंदर खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत.  या चित्रपटाने बॉक्स
ऑफिसवरही चांगली कामगिरी केली होती.  

सुशांतने बर्‍याच मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते की,  मी रोमियो अकबर वॉल्टर या चित्रपटात मला काम करायचे होते. पण माझ्याकडे पूर्वीच्या काही जबाबदाऱ्या आहेत ज्या मला पूर्ण कराव्या लागतील. मला त्याचा एक भाग व्हायचं आहे कारण या चित्रपटाची कहाणी मला आवडली आहे. या चित्रपटाचे निर्माते अजय कपूर म्हणाले, "चित्रपटाच्या शूटिंगची सगळी तयारी झाली होती. आमच्यात कोणताही वाद नाही किंवा चित्रपटातून सुशांतला मुद्दाम वगळलं गेलं नाही. फक्त तारखा जमत नव्हत्या म्हणून सुशांतला या चित्रपटात घेता नाही आलं."    

एका वृत्तानुसार सुशांतला ही फिल्म करायची होती. त्याने 15 दिवसांची मुदतही मागितली होती. पण कंटीन्यूटीचं कारण सांगत प्रोडक्शनने याला नकार दिला. हा चित्रपट सुशांतने केला असता तर तो त्याच्यासाठी महत्वाचा चित्रपट ठरला असता.

Sushant Singh Rajput will not appear in the movie Romeo Akbar Walter

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT