Tabu Ajay Devgan Relation Esakal
मनोरंजन

Tabu Ajay Devgan Relation: 'फक्त तुझ्यामुळे मी सिंगल', तब्बूने केला अजय देवगणवर आरोप! चर्चा पुन्हा रंगली

सकाळ डिजिटल टीम

Tabu Ajay Devgan Relation: 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अजूनही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकते मग ते अभियच्या बाबतीत असो किंवा सौदर्यांच्या बाबतीत. मात्र तिच्या सर्वच चाहत्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे इतकी प्रसिद्ध आणि देखणी असूनही तब्बुनं लग्न का केलं नाही.

तब्बूचं नाव अनेक अभिनेत्यांबरोबर जोडलं गेले आहे, परंतु एकाही तिचं एकही रिलेशन लग्नपर्यंत पोहचू शकले नाही. तब्बूच्या दमदार अभिनयाचे लोक वेडे आहेत, वयाच्या ५२ व्या वर्षीही तब्बू चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आहे

तब्बूला सर्वात जास्तवेळा तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारलो जातो. आता एका मुलाखतीत तब्बूने लग्न न करण्याचे कारण सांगितलं आहे. यात तब्बूनं पुन्हा तिचं लग्न न करण्याचं कारण अजय देवगण असल्याचं सांगितलं.

बॉलिवूडमध्ये अशा काही ठराविक जोड्या आहेत ज्या प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. त्यात तब्बू आणि अजय देवगण यांच्या जोडीचा सामावेश होतो. त्याच बॉन्डिंगही खास आहे. तब्बू आणि अजय देवगण यांनी कधीकाळी एकमेकांना डेटही केले होते. त्यानंतर अजयने काजोलशी लग्न केलं. मात्र तब्बू अजूनही अविवाहित आहे.

परंतु अजय देवगण आणि तब्बूमध्ये अजूनही चांगली मैत्री आहे. दोघेही 'दृश्यम 2' चित्रपटात दिसले होते. त्यातच आता पुन्हा तब्बूनं अजयवर आरोप केले आहेत आणि सध्या त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

काही काळापूर्वी तब्बूने एका मुलाखतीत अजय देवगणमुळे ती बॅचलर असल्याचा आरोप केला होता. तब्बूने अजय देवगणसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले होते.


तब्बूने मुलाखतीत सांगितले की , अजय देवगण लहान असताना तिच्या शेजारी राहयचा. तब्बूचे भाऊ समीर आणि अजय देवगण यांनी मिळून तिच्यावर नजर ठेवयचे. एखादा मुलाने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी हे दोघ त्याला धमकावून हाकलून द्यायचे. त्यामुळे तब्बू सिंगल असल्याचा दोष अजय देवगणला देत असते.

जरी तब्बूने या गोष्टी मस्करीमध्ये सांगितल्या असल्या तरी चाहत्यांचा अंदाज वेगळाच आहे. तब्बूने असेही म्हटले की, 'मला आशा आहे की अजय देवगणला आज या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असेल'.

दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्रीही कमालिची दिसते. तब्बू आणि अजयने विजयपथ, दृश्यम, गोलमाल अगेन, दे दे प्यार दे आणि दृश्यम 2 सारख्या ब्लॉकबस्टरसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT