The Vaccine War' box office collection Day 5 esakal
मनोरंजन

The Vaccine War Collection : नानांच्या 'व्हॅक्सीन वॉर'नं टाकली मान! पाचव्या दिवशीच आली सलाईन लावण्याची वेळ

नानांनी आपण जेव्हा सनीचा गदर पाहिला तेव्हा त्यांना काय जाणवले हेही मोकळेपणानं सांगितले होते.

युगंधर ताजणे

The Vaccine War' box office collection Day 5: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्सला जसा प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद होता तसा तो त्यांच्या द व्हॅक्सीन वॉरला दिसून आलेला नाही. भलेही त्यांनी नाना पाटेकरांच्या सोबतीनं या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले असले तरी प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे विविध वाहिन्यांवर मुलाखत देत आहेत. त्याचा विषय प्रामुख्यानं द व्हॅक्सीन वॉर हा चित्रपट आहे. पण त्यानिमित्तानं त्यांनी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांच्या परखड स्वभावानुसार भाष्य केले आहे. नाना हे नेहमीच त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

नानांनी आपण जेव्हा सनीचा गदर पाहिला तेव्हा त्यांना काय जाणवले हेही मोकळेपणानं सांगितले होते. याशिवाय त्यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखवर देखील त्यांनी भाष्य केले होते. त्याचीही चर्चा झाली होती. एकुणच अशाप्रकारे वातावरण निर्मिती करुन व्हॅक्सीन वॉरकडे लक्ष वेधण्याचा मेकर्सचा प्रयत्न हा काही प्रमाणात यशस्वी झालाही. प्रत्यक्षात बॉक्स ऑफिसवर व्हॅक्सीन वॉरला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही.

विवेक अग्निहोत्री यांचा व्हॅक्सीन वॉर हा २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्यानं पहिल्याच दिवशी एक कोटींची कमाई केली होती. याच दिवशी फुकरे ३, चंद्रमुखी २ प्रदर्शित झाले होते. त्यात फुकरे ३ ने बाजी मारल्याचे दिसून आले. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे. व्हॅक्सीन वॉरला दहा कोटींपर्यत पोहचण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागत आहे. सोमवारपर्यत या चित्रपटानं पाच कोटींचा आकडा पार केलेला नाही.

अग्निहोत्री यांनी व्हॅक्सीन वॉर पाहण्यासाठी प्रेक्षकांना एक खास ऑफरही दिली होती. त्यात एक तिकीट घ्या अन् दुसरे तिकीट मोफत मिळवा.अशी ती ऑफर होती. दोन दिवस त्यांनी अशाप्रकारे प्रेक्षकांना आवाहन केले. मात्र तरीही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. व्हॅक्सीन वॉरचे एकुण बजेट हे दहा कोटींचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हॅक्सीन वॉरविषयी बोलायचे झाल्यास त्यात नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक, सप्तमी गोडा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून कोरोनाच्या काळात ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी आणि आरोग्य सेवकांनी मोठे योगदान दिले त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञांनी व्हॅक्सीनच्याबाबत ते मुलभूत संशोधन केले त्यावरही चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.

इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्रींच्या द व्हॅक्सीन वॉरनं पहिल्याच दिवशी १.३ कोटींची कमाई केली होती. सोमवारी या चित्रपटानं दीड कोटींची कमाई केली होती. त्यामुळे येत्या दिवसांत या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

Bigg Boss Marathi 6 Live Update: रितेश देशमुखच्या सहकलाकार अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT