Hruta Durgule In 'Timepass 3' Marathi Movie Instagram
मनोरंजन

'टाइमपास ३' मध्ये प्राजक्ता-दगडू नाही,तर..? टीझर पाहून जाणून घ्या Details

मराठीतील सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

प्रणाली मोरे

'हम गरीब हुए तो क्या हुआ !' 'चला, हवा येऊ द्या !' 'नया है वह!' 'आई बाबा आणि साईबाबाची शपथ' यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू - प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती, शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि 'मला वेड लागले प्रेमाचे', 'फुलपाखरू', 'ही पोली साजूक तुपातली' सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे 'टाइमपास !'(Timepass3) झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव(ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाने सजलेले 'टाइमपास' आणि 'टाइमपास २' हे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. 'टाइमपास'मध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट 'टाइमपास २' मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

'टाइमपास ३' ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची ! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ' पालवी दिनकर पाटील' ! टाइमपास ३ च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी !

जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने. याशिवाय प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट काय असणार आहे ? ही पालवी कोण आहे ? चित्रपटात प्राजू दिसणार की नाही ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील पण त्याची उत्तरे हळूहळू मिळतच जातील. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे हे निश्चित !

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांचे आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT