कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेची रंगत वाढली असताना रविवारी एकूण दोन प्रयोग स्पर्धेत सादर झाले. शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या टीमने गिरीश कर्नाड लिखित, विजय तेंडूलकर अनुवादित ‘तुघलक’ या नाटकाचा देखणा प्रयोग स्पर्धेत सादर केला.
‘तुघलक’ हे महम्मद तुघलकावर बेतलेले नाटक. राजकारण, त्यातील डाव-प्रतिडाव, कुटनीतीवर भाष्य करणारे. सनकी स्वभावाचा हा बादशहा. त्याने याच सनकेतून राजधानी दिल्लीहून दौलताबादला स्थलांतरित केली आणि तांब्याच्या नाण्याची किंमत चांदीच्या नाण्याइतकी केली. चारही बाजूंनी कट्टर धार्मिक भितींनी घेरलेले असतानाही तुघलक धर्माच्या पलिकडे जाऊन माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो. हिंदू असो किंवा मुसलमान दोघेही माणसचं आहेत, हा त्याचा विचार मात्र सामान्य जनतेला मान्य नसतो आणि तेच त्याचे दुर्दैव ठरते. शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या टीमनं हा देखणा प्रयोग सादर केला. दर्जेदार संहिता तितक्याच ताकदीनं त्यांनी रंगमंचावर सादर केली. साहजिकच नेपथ्यासह सर्व तांत्रिक बाजूंनीही तितकीच सुरेख साथ दिली.
युवराज केळूसकर (तुघलक), गायत्री यमकर (सावत्र आई), सौरभ बेंद्रे (अझिझ), ऋतुराज पाटील (आझम), खंडू कोल्हे (नजीब), ओंकार पाटील (बरनी), विकास कांबळे (इमामुद्दीन/शमशुद्दीन), सूरज गुरव (शिहाबुद्दीन/तरुण), अजय इंगवले (रतनसिंह), गणेश पाटील (घियासुद्दीन/वृध्द), समर्थ गोडवे (आमिर/हिंदू), सिद्धराया उटगी (आमिर), सागर माने (आमिर), अमिताश शेट्टी (दवंडीवाला), तेजस्विनी ज्वारे (हिंदू स्त्री), रोहित पास्ते (सईद), रोहिदास अभंगे (व्दारपाल), प्रतीक वांगीकर, प्रशांत माने, राकेश तलवार (रक्षक), दौलतराव शिंदे (प्रौढ).
दिग्दर्शक : ज्ञानेश मुळे पार्श्वसंगीत : प्रसन्न देशमुख
प्रकाश योजना : संजय तोडकर नेपथ्य : विनायक सुतार
रंगभूषा- वेशभूषा : ओंकार पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.