Tunisha Sharma Death esakal
मनोरंजन

Tunisha Sharma Death: 'श्रद्धा सारखीच हत्या झाली असती'? तुनिषाला होती भीती!

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मानं केलेल्या आत्महत्येच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tunisha Sharma Death Case: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मानं केलेल्या आत्महत्येच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या त्या घटनेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी देखील याबाबत अनेक खळबळजनक माहिती दिली आहे. सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

तुनिषाचा बॉयफ्रेंड शिजान हा तिच्यासोबत रिलेशिपमध्ये असताना आणखी काही मुलींच्या संपर्कातही होता अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. असे असताना आता एका गोष्टीनं मात्र सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपासून श्रद्धा वालकर हत्या प्रकरण चर्चेत आले आहे. तिचा बॉयफ्रेंड आफताब पुनावालानं तिची हत्या केल्याचा आरोप आफताबवर करण्यात आला आहे.

Also read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

तुनिषाच्या प्रकरणात देखील तोच अँगल आहे का हे पोलिस आता पडताळून पाहत असताना त्यांना काही महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यातून तुनिषाला आपली देखील श्रद्धा वालकर प्रमाणे हत्या होऊ शकते अशी शक्यता त्यात पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत अजुन तपास सुरु असून पोलिसांनी तपासातील काही महत्वाच्या शक्यता म्हणून ही बाब अधोरेखित केली आहे. शिजाननं तुनिशासोबत ब्रेकअप का केले? पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रश्नाच्या उत्तरात आरोपीने पोलिसांना सांगितले की, श्रद्धा खून प्रकरणानंतर तुनिशा खूप तणावाखाली होती.त्यामुळे ती तणावात होती. शीजनने सांगितले की, वय आणि धर्माचा हवाला देत त्याने तुनिशासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि ब्रेकअप झाले.

त्या पंधरा दिवसांमध्ये असे काय झाले की, तुनिषानं एवढ्या टोकाचे पाऊल उचलले असा प्रश्न समोर आला आहे. तुनिषाचं साधारण दोन आठवड्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड शिजानसोबत ब्रेक अप झाले होते. वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाच्या प्रकरणात आतापर्यत १४ लोकांचा जवाब नोंदवण्यात आला आहे. त्यातून काही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. तुनिषानं शनिवारी तिच्या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. सध्या तुनिषा आणि तिचा बॉयफ्रेंड शिजानचा मोबाईल हा आता फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

सहा महिन्यांपासून तुनिषा शिजानसोबतच्या रिलेशनशिपमध्ये खूप आनंदी होती. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांच्यात वाद सुरु झाले होते. त्याचे कारण श्रद्धा वालकर प्रकरण होते की काय अशी चर्चा सुरु झाली असून तुनिषाच्या आईनं तर या सगळ्या प्रकरणाला तो शिजान जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT