Shikha Singh Google
मनोरंजन

Shikha Singh: टी.व्ही अभिनेत्रीनं रडत-रडत शेअर केला व्हिडीओ.. मानसिक स्वास्थ बिघडलंय असं सांगत म्हणाली..

कुमकुम भाग्य फेम शिखा सिंग आई बनल्यानंतर काही वर्ष मालिकांपासून दूर आहे. अचानक तिचा भावूक व्हिडीओ पाहून चाहतेच नाहीत काही कलाकारही चिंतेत सापडलेयत.

प्रणाली मोरे

Shikha Singh: कुमकुम भाग्य फेम शिखा सिंग गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्वास्थ बिघडल्यानं त्रस्त आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याला पाहिल्यानंतर तिची मानसिक अवस्था पटकन लक्षात येत आहे.

शिखानं या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. आई बनल्यानंतर शिखा टी.व्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे.

आता व्हिडीओला पाहून असं वाटत आहे की शिखा देखील आई बनल्यानंतर तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी चिंतित आहे. चाहते तिला अशा अवस्थेत पाहून मात्र काळजीत पडलेयत. (TV Actress Shikha Singh Mental health not good video viral)

शिखा सिंगनं इन्स्टाग्रामवर रडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यात ती म्हणताना दिसत आहे की,''काही दिवसांपासून मी पाहतेय मी जशी होते तशी मी आता नाही राहिले. मला मी स्वतःच हरवल्यासारखी वाटतेय..''

शिखाच्या या व्हिडीओला पाहून तिचं मानसिक स्वास्थ्य नीट नाही हे पटकन लक्षात येतंय. शिखा खूप चिंताग्रस्त दिसत आहे.

अभिनेत्रीनं यानंतर आणखी एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती सकाळी-सकाळी आपल्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. शिखानं आपल्या सध्याच्या अवस्थेवर उपचार म्हणून आपली मुलगीच बेस्ट थेरपी आहे असं म्हटलं आहे.

व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे की-''मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्यासोबत काय चुकीचं घडतंय. मी आभारी आहे की माझ्यावर प्रेम करणारे तुमच्यासारखे माझे चाहते माझ्यासोबत आहेत. देवाचे मी यासाठी खूप आभार मानते. मला हे माहितीय की अशा मेडिकल कंडिशनमधनं जाणारी मी एकटीच नाही. माझ्यासारखं अनेकांचे मानसिक स्वास्थ बिघडलेले असेल.पण अशावेळी धैर्यानं गोष्टी हाताळणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि आपली चांगली वेळ कधीतरी येतेच''.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

तुम्हाला माहितीसाठी इथं सांगतो की या व्हिडीओला पाहिल्यानंतर शिखाचे चाहते आणि सोबत काही कलाकारांनी तिच्यासाठी चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येकजण शिखाच्या मानसिक स्वास्थाविषयी काळजी व्यक्त करताना दिसत आहे.

मृणाल ठाकुरनं लिहिलं आहे की-'पण तुला माहित आहे नं आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो'. अली गोनीनं देखील शिखाच्या पोस्टवर कमेंट करत तिला मानसिक आधार दिला आहे.

शिखानं २०१६ साली पायलट करण शाह सोबत लग्न केलं होतं. त्यानंतर शिखानं आपली मुलगी अलायनाला जन्म दिला. शिखा आई बनल्यानंतर खूप काळ मालिकाविश्वापासून दूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT