Urfi Javed Instagram
मनोरंजन

Urfi Javed: बॉलीवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकावर उर्फीचा आरोप.. म्हणाली,'मला प्रोजेक्टसाठी फोन केला आणि थेट ...'

उर्फी जावेदनं पुन्हा आपल्याला धमकी मिळाल्याचा खुलासा केला आहे. पोलिस स्टेशनबाहेरचा तिचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

प्रणाली मोरे

Urfi Javed: उर्फी जावेदच्या मागचा वादांचा ससेमिरा काही कमी होताना दिसत नाहीय. उर्फीनं खुलासा केला की तिला कॉल करून धमकी देण्यात आली आहे. एका माणसानं तिला मारुन टाकण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. उर्फी जावेदनं आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यामध्ये ती पोलिस स्टेशनच्या बाहेर बसलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये उर्फी जावेद बोलताना दिसतेय की तिला दिग्दर्शक नीरज पांडेच्या ऑफिसमधून कॉल आला होता. त्या व्यक्तीनं एका नवीन प्रोजेक्ट संदर्भात बोलण्यासाठी ऑफिसला बोलावलं होतं.

व्हिडीओनंतर उर्फीनं एक पोस्ट शेअर करत या धमकी संदर्भात सगळी डिटेल्स दिली आहे. तिनं लिहिलं आहे, ''दिग्दर्शक नीरज पांडेच्या ऑफिसमधून मला एका माणसानं कॉल केला होता. त्यानं मला सांगितलं की तो दिग्दर्शकाचा असिस्टंट आहे आणि मला त्याला भेटायचं आहे. मी त्याला सांगितलं की भेटण्याआधी मला प्रोजेक्ट संदर्भातील सबंध माहिती पाठवा. त्यामुळे तो माणूस माझ्यावर रागावला. तो मला म्हणाला की, नीरज पांडेचा अपमान करण्याची तुझी हिम्मतच कशी झाली?''(Urfi Javed Says someone from director neeraj pandey office is harassing her)

अभिनेत्री पुढे म्हणाली,''तो माणूस मला म्हणाला की त्याला माझ्या गाडीचा नंबर माहितीय. माझ्याविषयी त्याला सगळं माहित आहे. मला मरेपर्यंत मारायला हवं. माझी हिच लायकी आहे. कारण मी चांगल्या प्रकारचे कपडे घालत नाही. आणि हे सगळं फक्त तो यासाठीच म्हणाला कारण प्रोजेक्ट संदर्भात संपूर्ण माहिती कळण्याआधी मी त्याला भेटण्यास नकार दिला होता''

दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या घटनेसंदर्भात अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 'अ वेनेसडे', 'बेबी', 'स्पेशल २६' सिनेमांसाठी नीरज पांडे यांना ओळखलं जातं.

उर्फी जावेदनं गेल्या डिसेंबरमध्ये एका व्यक्तीविरोधात केस दाखल केली होती. त्या व्यक्तीवर आरोप केला गेला होता की त्यानं उर्फीला बलात्काराची धमकी दिली होती आणि गलिच्छ शब्दांचा वापर करत एक ऑडिओ क्लीप पाठवली होती. त्या व्यक्तीचं नावं रंजन गिरी होतं. त्याच्याविरोधात 354A,354D,506(2),509 या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Urfi Javed Post

उर्फी जावेदने याआधी देखील अनेकदा बलात्कार आणि जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमक्यांचा खुलासा केला होता. लोकांना नेहमीच तिची विचित्र फॅशन खटकते. लेखक चेतन भगतनं उर्फीचे कपडे आणि ज्या पद्धतीचा कंटेट ती सोशल मीडियावर पोस्ट करते याविषयी खुलासा करत तिच्यावर सडकून टिका केली होती,ज्यानंतर अभिनेत्रीनं कडक शब्दात पलटवार केला होता. उर्फी नेहमीच सांगत आलीय की तिला जसं वाटतं ,तसंच ती वागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT