Urmial Matondkar And Shahrukh Khan 
मनोरंजन

Urmila Matondkar: 'अरे वेळ काय, बोलता काय, जे झालं ते दुर्देवी'

भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. त्यांना निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.

सकाळ डिजिटल टीम

Lata Mangeshkar: भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. त्यांना निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. त्यात बॉलीवूडमधील कलाकारांचा (Bollywood Celebrity) समावेश होता. यावेळी अनेकांनी लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यामध्ये बॉलीवूडचे अभिनेते शाहरुख खान (King Khan Shahrukh Khan) यांनी मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral On Social Media) झाल्याचे दिसुन आले होते. त्यावरुन किंग खान शाहरुखला ट्रोल केले जात आहे. यासगळ्या घटनेचे सोशल मीडियावर पडसाद उमटले आहेत.

या घटनेवर शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) म्हणाल्या, मला हे सगळं संतापजनक वाटतं. ज्यांनी कुणी हे सगळं सोशल मीडियावर पसरवलं आहे ते विकृत आहे. हे सगळं काय चाललं आहे. मला वाटत नाही जे अशाप्रकारे बोलत आहेत ते भारताचे नागरिक आहेत म्हणून. एक देश, समाज म्हणून आपण सगळ्यांनी विचार करायला हवं. शाहरुख खान हा काही सामान्य व्यक्ती नाही. शाहरुख खान यांचं काम मोठं आहे. त्यानं हात जोडले, दुवाही मागितली. त्याकडे इतक्या गलिच्छ नजरेनं पाहिलं जातंय याचं नवल वाटतं. दोन रुपयाच्या ट्रोलर्सचे हे काम आहे. मी ज्यांचे रिव्टिट केले ते भाजपचे प्रवक्ते आहेत. आपण कोणत्यावेळी काय बोलतो आहोत याचे भान ठेवावे. मला हे सगळं संतापजनक वाटतं आहे.

मी आज कुठल्याही पक्षाच्या वतीनं बोलत नाही. मी मुळात भारताची सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. आपण एवढे रसतळाला गेलो कसे? अशाप्रकारे वागणारा समाज कधीही प्रगती करत नाही. निवडणूका आहेत म्हणून हे सगळं चाललं आहे का, असा प्रश्नही उर्मिला यांनी यावेळी उपस्थित केला आहे. लता दीदींनी श्रद्धांजली अर्पण करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शाहरुखने यावेळी दोन्ही हात जोडून दुआ केली आणि त्यानंतर मास्क खाली करून फुंकर मारली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शाहरुख थुंकला असल्याचा आरोपही काही लोकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुणे आणि राज्यात 'थंडी'ची चाहूल; मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाड्यातही पारा खाली

Uddhav Thackeray: शेतकरी उद्‌ध्वस्त, सरकारकडून विकासाच्या गप्पा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; बार्शी तालुक्यातील घारीत शिवसेनेचा संवाद दौरा

Jalgaon Bus Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्स बस अन् टॅंकरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , ७ गंभीर जखमी

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

SCROLL FOR NEXT