Prajakta Mali Instagram
मनोरंजन

Valentine Day 2023: अखेर प्राजक्ता माळीनं सांगितलं तिचं रिलेशनशीप स्टेट्स..चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्राजक्ता माळीनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Prajakta Mali: व्हॅलेंटाईन डे निमित्तानं आज जिकडे तिकडे प्रेमाला बहर आलेला दिसत आहे. सोशल मीडियावर हा बहर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटीपंर्यंत साऱ्यांच्या पोस्टच्या रुपात समोर आलेला दिसत आहे. आता सर्वसामान्य लोकांना सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यात नेहमीच इंट्रेस्ट असतो.

त्यात खासकरुन कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री कोणाला डेट करतायत याबाबत तर जरा अधिकच उत्सुकता असते सर्वांना. त्यामुळे आजच्या प्राजक्ता माळीच्या व्हॅलेंटाईन स्पेशल पोस्टला म्हणूनच वजन आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या रिलेशनशीपच्या अनेक चर्चा कानावर पडत आहे. तिचं प्रेम ते तिचं ब्रेकअप सारं काही. आता झालं गेलं सगळं जुनं झालं पण सध्या मॅडम सिंगल आहेत का हा प्रश्न सगळ्यांनाच होता.

त्यामुळे आज व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्राजक्तानं पोस्ट करत आपल्या रिलेशनशीप स्टेट्स विषयी पोस्ट करत जाहीर करून टाकलं आहे.

प्राजक्ता माळीनं एक पोस्ट केलीय..जी खरंतर एक फोटो पोस्ट आहे. लाल रंगाच्या साडीत प्राजक्तानं छान छान फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन देत आपलं रिलेशनशीप स्टेट्स जाहीर करून टाकलं आहे.

प्राजक्तानं फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, ''Be your own valentine
Zone; to be continued..🤪
.
(अखिल भारतीय single संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे..
.
Loving this freedom though..☺️
Anyway, guys…
Be the love, spread the love. Coz love is the only thing we all should believe''.

प्राजक्तानं आपण सिंगल असल्याचं जाहीर केलं आहे. आता या सोशल मीडियावरच्या खास सेलिब्रिटीच्या पोस्टवर लोकांच्या कमेंट्स आल्या नसत्या तर नवल.

एकानं लिहिलं,'तु गोरी असुन पण सिंगल कशी काय?',

तर आणखी एकानं लिहिलंय,'एवढी प्रतिभावंत व्यक्ती single असेल तर आम्ही काहीच नाही. धन्यवाद आमच्या दुःखात सहभागी झाल्याबदल' ,

तर कुणी एकानं,'पण तू आमच्यात सामील होण्यापेक्षा आमच्यातून एकाला कमी का करत नाहीस'. असं म्हणत थेट प्राजक्ता समोर प्रपोजलच ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

PM Narendra Modi: तेजस्वी यांच्या नावाला सहमती नव्हती; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

SCROLL FOR NEXT