When Madhu Sapre said 'You don't get noticed unless you expose' Sakal
मनोरंजन

'अंगावर कपडे नाहीच,फक्त अजगर',न्यूड फोटोशूट नंतर मधू सप्रेच्या उत्तराचा कहर

मिलिंद सोमण सोबतचे हे न्यूड फोटोशूट मधू सप्रेनं एका कमर्शिअल जाहिरातीसाठी केलं होतं. हे जुनं वादग्रस्त प्रकरण आहे.

प्रणाली मोरे

माजी मिस इंडिया मधू सप्रे(Madhu Sapre) वादाच्या(Controversy) भोवऱ्यात सापडली होती जेव्हा तिनं अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman)सोबत न्यूड फोटो(Nude Photo) पोझ दिली होती. हे न्यूड फोटोशूट एका कमर्शिअल जाहिरातीसाठी करण्यात आलं होतं. सर्वच स्तरावरनं या न्यूड फोटोवर सडकून टिका करण्यात आली होती.(When Madhu Sapre said 'You don't get noticed unless you expose')

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या जुन्या मुलाखतीत मधू म्हणाली होती,''मला तेव्हा जास्त धक्का बसला आणि हसायला देखील आलं की सिनेइंडस्ट्रीतल्या लोकांनी मला नावं ठेवली आहेत. तिच्यामते तिच्यावर बॉलीवूड मधून टिका होईल अशी अपेक्षा नव्हती. कारण सिनेमा हे असं क्षेत्र आहे तिथे जर तुम्ही स्वतःला एक्सपोज केलं नाही तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. तिथे या गोष्टी वेगवेगळ्या अॅंगलने सर्रास चालतात''.

याविषयी थोडं अधिक स्पष्ट बोलताना मधू सप्रे म्हणाली होती,''याच सिनेइंडस्ट्रीत जर एखादी अभिनेत्री उत्तम कलाकार असेल पण सेक्सी किंवा हॉट, बोल्ड अशा कॅटॅगरीत बसत नसेल तर तिच्याकडे सिनेमे पाठ फिरवतात. आणि हे फॅक्ट आहे. याउलट अभिनय नसला आणि बाकी सगळं आधी म्हटल्याप्रमाणे एखाद्या अभिनेत्रीकडे असेल तरी ती त्या जोरावर चालते. इकडे जेवढं अंगप्रदर्शन कराल तेवढं पुढे जाल. अन्यथा कुणीही तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही''.

मधू पुढे म्हणाली होती,''मला मिलिंदसोबतच्या त्या न्यूड फोटोशूटमध्ये काही चुकीचं,आक्षेपार्ह केलंय असं मुळीच वाटत नाही. खरं तर यापेक्षा एखाद्या स्त्रीला मारहाण झाली,तिचा रेप झाला,तिचा खून झाला, मानसिक छळ झाला तर माझ्या मते आक्षेप घ्यायला हवा,विरोध करायला हवा''.

''मनोरंजन आणि फॅशन ही दोन्ही क्षेत्र झपाट्यानं पुढे सरकतायत.जगात काय सुरु आहे,आपण कुठे आहोत,काय विचार करत आहोत हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात न्युडिटी नसतेच असं आपण म्हणू शकता नाही. काही प्रमाणात ती असतेच आणि पुढील काही वर्षात तर न्यूडिटीनं हे दोन्ही प्लॅटफॉर्म व्यापले जातील. उद्या स्क्रीनवरही आपण हे न्यूड सीन्स पाहू,कदाचित ती त्या काळाची गरज असेल''. हे एक जुनं वादग्रस्त प्रकरण आहे. त्या न्यूड फोटोशूटनंतर मधू सप्रेची मी न्यूड फोटोशूट केलं तर काय झालं अशी भूमिका त्यावेळी म्हणजे २५ वर्षांपूर्वी कहरच वाटली होती.

या न्यूड फोटोशूट नंतर मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्यावर अश्लील कृत्य केल्या प्रकरणात केस दाखल झाली होती. २००९ मध्ये हे दोघेही या केसमधून सहीसलामत बाहेर पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT