Shahid Kapoor Google
मनोरंजन

''ते खरं प्रेम नव्हतंच मुळी" शाहिदचं करिनाला घेऊन मोठं वक्तव्य

एका मुलाखतीतनं अभिनेत्याने 'प्रेम' या विषयावर थेट मतं मांडली होती.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा हॅन्डसम हन्क शाहिद कपूरच्या(Shahid Kapoor) प्रेमात अजूनही अनेक मुली पडत असतील. अर्थात एक काळ होता की बॉलीवूडच्या देखण्या अभिनेत्री देखील त्याच्या प्रेमात झुरायच्या. त्याचं सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे करिना कपूरसोबतचं. त्यावेळी दोघं सगळयाच कार्यक्रमात अगदी हातात हात घालून एकत्र दिसायचे. 'कॉफी विथ करण'मध्ये तर करिनानं अगदी सर्वांसमोर पहिल्यांदाच शाहिदचं नाव घेऊन प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हा ती खरंच त्याच्या प्रेमात होती असं स्पष्ट तिच्या चेहऱ्याकडे पाहून दिसत होतं. पण कदाचित त्या दोघांच्या नशीबात एकत्र राहणं नव्हतच लिहिलेलं. ते विभक्त झाले अनं काहीच दिवसांत शाहिदला प्रियंका चोप्रा भेटली अन् करिनाच्या आयुष्यात सैफ अली खान आला.

तेव्हा शाहिदच्या फ्लर्ट करण्याच्या स्वभावामुळेच करिनानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला हे कारण समोर आलं होतं. पण खऱं काय ते शाहिद-करिनाला माहित. पण ज्यांना वाटत होतं की शाहिद-करिना यांच्यात खरं प्रेम होतं त्यांच्यासाठी मात्र शाहिदनं एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरामुळे चक्रावण्याचीच पाळी येईल बहुधा. ही मुलाखत तशी जुनी आहे. सिमी गरेवालच्या शो मध्ये शाहिद गेला असताना त्याला तिनं प्रश्न विचारला,''तू खरं प्रेम केलं आहेस का?'' त्यावर तो म्हणाला,''मी मुलींना भेटलो की त्यांच्या प्रेमात पडायचो. पण ते खरं प्रेम नव्हत हे मात्र १०० टक्के. एक-दोन वेळा प्रेमात होतो पण आता वाटतंय ते ही खरं नव्हतंच मुळी.मला आतापर्यंत खरं प्रेम झालंच नाही. मी त्याच्या प्रतिक्षेत आहे. प्रेमात कुणी तरी एक साथी समजूतदार हवा. माझ्याबाबतीत असं आतापर्यंत झालं नाही'' आता हे सगळं करिनापासू विभक्त झाल्यावर शाहिद बोललाय बंर का.

Shahid kapoor,Mira Rajput

ही मुलाखत २०११ मधील आहे. त्याआधी शाहिदच्या आयुष्यात करिना आणि मग प्रियंका अशा बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री येऊन गेल्या होत्या. २०१५ मध्ये शाहिदनं मीरा राजपूतशी घरच्यांच्या संमतीने अरेंज्ड मॅरेज केलं. आज त्याला मिशा आणि जेन ही दोन मुलं आहेत. तो आपल्या कुटुंबासोबत खूश आहे. उलट.काहीच दिवसांपूर्वी त्यानं एका मुलाखतीत म्हटलं होतं, ''मीरा माझ्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहे पण माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे''. काही का असेना शाहिदला हवी होती तशी समजूतदार जोडीदार मिळाली म्हणायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT