Who is Rahul Navlani threaten physically abuse tv actress vaishali takkar
Who is Rahul Navlani threaten physically abuse tv actress vaishali takkar  Google
मनोरंजन

Vaishali Takkar Suicide: कोण आहे राहूल नवलानी, ज्याच्या धमक्यांनी वैशालीचं जगणं अशक्य केलं होतं...

प्रणाली मोरे

Vaishali Takkar Suicide: छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री वैशाली ठक्करनं वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी आत्महत्या केल्याचं समोर आलं अन् सगळेच हळहळले. ती इंदौर येथे राहत होती. आणि त्याच तिच्या राहत्या घरी तिनं गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना तिच्या घरातून सुसाइड नोट मिळाली आहे,ज्यात तिनं तिचा शेजारी राहूल नवलानीवर तिला त्रास दिल्याचे आरोप केले आहेत. तसंच तिनं राहूलची पत्नी दिशा हिचा देखील सुसाइड नोटमध्ये उल्लेख केला आहे. पण हे दोघे कोण आहेत आणि यांचे वैशालीशी काय संबंध होते,चला जाणून घेऊया सविस्तर(Who is Rahul Navlani threaten physically abuse tv actress vaishali takkar)

वैशाली ठक्करने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले होते की, ''राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा यांनी मला मानसिक रित्या खूप छळले. आई-बाबा मला माफ करा,मी तुमची चांगली मुलगी नाही बनू शकले. फक्त मला माहित आहे मी काय भोगलं आहे गेल्या २ वर्षात. राहुल नवलानीनं माझ्याोबत काय-काय केलं आहे हे मी नाही सांगू शकत. त्यानं माझं लैंगिक शोषण तर केलंच पण मला मानिसकरित्या देखील खूप छळलं आहे. आणि अखेर तो जे म्हणाला होता ते त्यानं करुन दाखवलं,माझं लग्न मोडलं त्याने. राहूल आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा द्या. माझा अडीच वर्षांपासून त्यांनी छळ केला आहे. त्यांना शिक्षा नाही झाली तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मितेशला म्हणावं वैशालीला माफ कर. Quit! वैशाली टक्कर''.

आता प्रश्न निर्माण होतो की वैशालीनं सुसाइड नोटमध्ये ज्या राहूलचा उल्लेख केला आहे त्याचा वैशालीचं लग्न मोडण्यात नेमका काय हेतू होता? एप्रिल,२०२१ मध्ये वैशालीचा साखरपुडा झाला होता. एका वेबसाईटला त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती,तिचं ज्या मुलाशी लग्न होणार आहे तो केनियात राहतो आणि व्यवसायाने डेंटल सर्जन आहे. त्यांची भेट एका मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून झाली होती,मग भेटीगाठी झाल्या आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. तो मुलगा तिला भेटायला भारतातही यायचा.

Who is Rahul Navlani threaten physically abuse tv actress vaishali takkar

राहुल नवलानी संदर्भात वैशालीचा भाऊ नीरजनं सांगितलं आहे की, राहुल आणि वैशालीचे वडील हे चांगले मित्र होते. राहुलच्या वडीलांचा प्लायवूडचा बिझनेस आहे.राहूलही त्या बिझनेसमध्येच आहे. राहुलची एक फर्म देखील आहे. गेल्या १०-१२ वर्षांपासून राहूल त्याच सोसायटीत राहतो,ज्या सोसायटीत वैशाली आपल्या कुटुंबासोबत राहायची.

वैशालीचा भाऊ नीरजचं म्हणणं आहे की वैशाली आणि राहूल दोघं एकत्र जीमला जायचे. त्यादरम्यान वैशालीनं एकदा भावाला राहूल आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा नीरजला वाटलेलं सगळं ठीक होईल. त्यामुळे त्यानं पोलिसांची मदत न घेण्याचं ठरवलं. कारण राहूल शेजारी असल्यानं नीरज आणि वैशालीला पोलिसांना त्या वादात आणणं योग्य वाटलं नाही.

वैशालीनं केनियास्थित डॉक्टर अभिनंदन सोबत साखरपुडा केला होता,पण लग्न होऊ शकलं नाही. अभिनेत्रीनं मागे एका मुलाखतीत कोरोनामुळे लग्न पुढे ढकलल्याचं सांगितलं होतं पण ते कारण खरं नव्हतं. नीरजच्या सांगण्यानुसार,वैशाली आणि राहूल दोघे कुठेतरी फिरायला गेले होते तेव्हा त्यांचे एकत्र फोटो होते. त्या फोटोंच्या आधारावर राहूल वैशालीला नंतर धमक्या द्यायचा. म्हणायचा,'हे फोटो सगळयांना दाखवेन आणि तुझं लग्न होऊ देणार नाही'.

आणि राहूल जे बोलला होता,त्यानं तसं केलं देखील. वैशालीचा अभिनंदनसोबत साखरपुडा एप्रिलमध्ये झाला त्यानंतर राहूलनं ते फोटो अभिनंदनला दाखवले. तसंच, मेसेज करुन वैशालीसोबत लग्न न करण्याचे देखील सांगितले. वैशालीचं लग्न जूनमध्ये होणार होते. वैशाली मुंबईतली आपली शूटिंग संपवून मुंबईला आली होती. सगळी तयारी झाली होती.

पण अभिनंदनने फोटो पाहिल्यावर लग्न तोडलं होतं. नंतरही राहूलनं वैशालीला त्या फोटोंच्या आधारे धमकावणं सुरूच ठेवलं. वैशालीचं जेव्हा पुन्हा मितेश नावाच्या मुलासोबत लग्न ठरलं तेव्हा राहूलनं पुन्हा धमक्या देणं सुरु केलं आणि मितेशला फोटो दाखवेन असं वैशालीला सांगितलं. शेवटी राहूलच्या धमक्यांना घाबरुन वैशालीनं हार पत्करत मृत्युला कवटाळण्याचा निर्णय घेतला,आणि आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT