Siddhant kapoor news  esakal
मनोरंजन

Siddhant Kapoor: ड्रग्ज घेतल्याचा आरोप झालेला सिद्धांत कपूर आहे तरी कोण?

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर (bollywood Actor Shakti kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूरवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

युगंधर ताजणे

Siddhant Kapoor: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर (bollywood Actor Shakti kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूरवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला बंगळुरु पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होताना (Viral News) दिसत आहे. तो कोण आहे, तो काय काम करतो, त्यानं खरचं ड्रग्ज घेतलं असेल का, यासगळ्यात त्याचे वडील शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया काय आहे, असे वेगवेगळे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहे. याप्रकरणावर शक्ती कपूर (entertainment news) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली होती. त्यांनी अद्याप आपल्याला या प्रकरणाबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

काही झालं तरी आपला मुलगा अशा प्रकारचे कृत्य करणार नाही. अशी ठाम प्रतिक्रिया शक्ती कपूर यांनी मीडियाला दिली होती. सिद्धांतसह आणखी सहा (Social media news) जणांना अटक करण्यात आली आहे. एका फोर स्टार हॉटेलमध्ये सुरु असणाऱ्या रेव्ह पार्टीच्या दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये सहा जणांना जेरबंद (entertainment news) कऱण्यात आले होते. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांच्या मुलाचा समावेश होता. ज्यावेळी एखाद्या सेलिब्रेटीचं नाव अशा गोष्टींतून चर्चेत येतं तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. हे आर्यन खानच्या प्रकरणातून समोर आले होते.

शाहरुखचा मुलगा आर्यन खान प्रकरणी शाहरुखनं दोन दिवसांपूर्वी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यात तो म्हणतो, माझ्या मुलावर त्या घटनेचा मोठा परिणाम झाला आहे. तो अजून त्या प्रकरणातून बाहेर आलेला नाही. त्याची मानसिकता व्यवस्थित नाही. मीडियाचे अतिरेकी वार्तांकन यावरही शाहरुखनं बोट ठेवले होते. आता शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याबाबतही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. सिद्धांत हा एक डीजे आहे. यानिमित्तानं तो देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये डीजेच्या शो साठी जात असल्याचे त्याचे वडिल शक्ती कपूर यांनी सांगितले होते.

पोलिसांनी ज्या सहा जणांना अटक केली होती त्यांची मेडिकल टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आल्याचे दिसून आले आहे. सिद्धांतला एक बहिण आहे. तिचे नाव श्रद्धा कपूर असून ती बॉलीवूडची मोठी अभिनेत्री आहे. भलेही प्रसिद्धीच्याबाबत सिद्धांत हा त्याचे वडील आणि बहिणीच्या कित्येक पावलं मागे असेल मात्र आता त्यानं जे काही केलंय त्यामुळे तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धांत आतापर्यत कोणत्याही चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसलेला नाही. मात्र त्यानं यापूर्वी शुट आऊट अॅट वडाला, हसीना पारकर, जज्बा सारख्या चित्रपटांत दुय्यम भूमिका साकारली आहे. याशिवाय तो भौकाल सारख्या क्राईम थ्रिलर वेबसीरिजमध्ये दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT