Zoya Akhtar Scolded Amitabh Bachchan Google
मनोरंजन

Amitabh Bachchan यांच्यावर सर्वांसमोर झोया अख्तरनं केलेली आगपखड..'लक्ष्य' च्या सेटवर असं काय घडलेलं?

नुकतंच एका मुलाखतीत अनुराग कश्यपनं हा हैराण करणारा किस्सा शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Zoya Akhtar Scolded Amitabh Bachchan: बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आज ज्या ठिकाणी विराजमान आहेत तिथे पोहोचण्याचं स्वप्न सिनेइंडस्ट्रीतील प्रत्येक तरुण मनाचं असतं. त्यांच्यापुढे इंडस्ट्रीतील सगळेच नतमस्तक होतात.

पण इंडस्ट्रीत अशी एक तरुण दिग्दर्शिका आहे जिनं एका प्रोफेशनल कारणामुळं थेट अमिताभ बच्चन यांची शाळा घेतली होती. ही तरुण दिग्दर्शिका दुसरी तिसरी कुणी नसून जावेद अख्तर यांची मुलगी झोया अख्तर आहे.

चला जाणून घेऊया अमिताभ बच्चननी असं काय केलं होतं ज्यामुळे झोया अख्तरनं त्यांच्यावर आगपखड केली होती.

'गॅंग्स ऑफ वासेपूर' सारखी गाजलेली सिरीज बनवणारा दिग्दर्शक अनुराग कश्यपनं नुकतंच एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे. अनुराग कश्यपनं हा किस्सा सांगताना म्हटलं की,फरहान अख्तरच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या 'लक्ष्य' सिनेमात अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका साकारत होते.

तसं अमितभ बच्चन नेहमीच सेटवर वेळेत पोहोचतात. पण काही कारणामुळे ते एकदा सेटवर वेळेत पोहोचू शकले नाहीत. झोया खूप प्रोफेशनल होती. त्यावेळी ती फरहान अख्तर सोबत सह-दिग्दर्शिका म्हणूनही काम पाहत होती आणि प्रॉडक्शन कंट्रोलचं कामही तिच्याकडे होतं.

जेव्हा तिला कळलं की अमिताभ बच्चन सेटवर वेळेत पोहोचेलेले नाहीत तेव्हा तिनं बिग बी यांना फोन लावला आणि सगळ्यांसमोर त्यांना रागात म्हटलं की,''सर,सेटवर तुमचा सीन लागतोय,कुठे आहात तुम्ही..इथे गरज आहे तुमची''.

आपल्या माहितीसाठी इथं सांगतो की झोया अख्तर सध्या 'द आर्चीस' सिनेमात व्यस्त आहे. हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा देखील आहे, हे तिन्ही स्टार किड्स या सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT