tracker.jpg 
मराठवाडा

लातूरात चोरीस गेलेले ट्रॅक्टर बारा तासात जप्त! 

हरी तुगावकर

लातूर : रामेगाव तांडा (ता. लातूर) येथून चोरीस गेलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात येथील सायबर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 


रामेगाव तांडा येथील बाळासाहेब राठोड यांचे साडेतीन लाख रुपये किमतीचे महिंद्रा अर्जुन आल्ट्रा एक कंपनीचे ट्रॅक्टर हेड (एमएच २४ एजी ०४७७) बुधवारी (ता. चार) रात्री चोरीस गेले होते. 

या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पथके नियुक्त केली होती. त्या अनुषंगाने सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन. डी. उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक सूरज गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. बुधवारी या पथकाच्या पोलिसांनी वाहनाचा व आरोपीचा शोध घेत मुरुडकडे जात असताना एक व्यक्ती ट्रॅक्टरचे हेड घेऊन लातूर वरंवटी रायवाडी रस्त्याने जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. हे ट्रॅक्टरचे हेड चोरीचे असल्याचे खात्री झाल्यानंतर पोलिसांनी रायवाडी शिवारात आरोपीचा शोध घेतला.

यात पोलिसांनी शिवदर्शन सदाशिव हिंगमिरे (वय २७, रा. हरंगूळ) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले हे ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने हे ट्रॅक्टर चोरीचे असल्याचे कबूल केले. तसेच या पूर्वी गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एचएच २४ एव्ही ८७१९ ही मोटारी सायकल चोरी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी हे ट्रॅक्टर तसेच मोटार सायकल असा एकूण चार लाखांचा माल जप्त केला आहे. याकरिता सहायक पोलिस निरीक्षक सूरज गायकवाड, पोलिस नाईक प्रदीप स्वामी, अमर वाघमारे या सायबर पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, हवालदार राम गवारे, पोलिस नाईक सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजू मस्के यांनी पुढाकार घेतला. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Stock Market Closing Bell : शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल रंगात बंद; सेसेक्स 519 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : मणिपूरमधील चुराचंदपूरमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

IPL 2026 : KL Rahul च्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्सने KKR समोर ठेवले तीन पर्याय, कोलकाता फ्रँचायझीने दाखवला ठेंगा

ODI Rankings: स्मृती मानधनाच्या सिंहासनाला धक्का! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला टेन्शन देणारी फलंदाज बनली नंबर वन

SCROLL FOR NEXT