Advantage Maharashtra EXPO-2020 in Aurangabad
Advantage Maharashtra EXPO-2020 in Aurangabad  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेतील महाएक्‍स्पोतून मराठवाड्याची गगनभरारी येणार जगासमोर (वाचा सविस्तर)

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे (मासिआ) 2005 पासून ऍडव्हान्टेज महाएक्‍स्पो घेण्यात येत आहे. अवघ्या वीस लघुउद्योजकांच्या स्टॉलच्या साथीने सुरू झालेला हा प्रवास आज 450 लघुउद्योजकांच्या स्टॉलपर्यंत आला आहे. भविष्यात या एक्‍स्पोला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळणार असल्याचा विश्‍वास मासिआतर्फे व्यक्‍त केला जात आहे. 

"कलाग्राम' परिसरातील 32 एकरांत नऊ ते 12 जानेवारीदरम्यान हा सातवा ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो- 2020 घेण्यात येत आहेत. उद्योजकांसाठी महाजत्रा असलेल्या या एक्‍स्पोमुळे नवीन ग्राहक आणि नवीन उद्योजक तयार होत आहे. गुरुवारी (ता. नऊ) या एक्‍स्पोचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. समारोप कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. 

मराठवाड्यातील उद्योजकांच्या गरुडभरारीचे प्रदर्शन 

एक्‍स्पोचे समन्वयक सुनील कीर्दक म्हणाले, की 16 एकरांत हा भव्य एक्‍स्पो आणि 16 एकरांत पार्किंग असे 32 एकरांत हा एक्‍स्पो घेण्यात येत आहेत. या प्रदर्शनात लहान, मध्यम तसेच मोठ्या सर्वच प्रकारच्या उद्योगांनी आपला सहभाग नोंदविला आहे. जगभर निर्यात होणारी शेकडो प्रकारची उत्पादने, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, अनोखे प्रयोग आणि अभिमान वाटावी अशी मराठवाड्यातील उद्योजकांची गरुडभरारी यातून प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनास राज्य शासन, पर्यटन विकास महामंडळ आणि केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, एमएसएमई राष्ट्रीय लघुउद्योगक निगम आणि राज्य शासनाचा उद्योग विभाग यांचे सहकार्य आहे. एक्‍स्पोत प्रदर्शनाशिवाय विविध विषयांवर चर्चासत्र होतील. भविष्यातील संधी, ऍग्रोप्रोसेसिंग, युवा संवादातून युवा राजकीय नेते, मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धीरज देशमुख यांचे मराठवाड्याविषयीचे व्हिजन तरुण उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना कळणार आहे. 

एक्‍स्पोने दिले नवे उद्योजक अन्‌ उद्योगांना नवीन संधी 

दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो शहरात होणारी एक्‍स्पोची संस्कृती मासिआमुळे मराठवाड्यात रुजली आहे. सुरवातीला दुष्काळ, अतिवृष्टीमुळे एक्‍स्पोवर सावट राहील असे वाटले होते; मात्र गेल्या महाएक्‍स्पोमध्ये 270 लघुउद्योजकांनी सहभाग घेतला. तर यंदा यापेक्षा दुप्पट 450 स्टॉलधारकांनी सहभाग नोंदवत मराठवाड्यात किती क्षमता आहे, हे दाखवून दिले. यामुळे या एक्‍स्पोतून देशभरासह जगभरात औरंगाबादच्या लघुउद्योजकांची क्षमता कळणार आहे. 

स्ट्रेंथ ऑफ मराठवाडा

मेड इन इंडियातून उद्योजकांना प्रमोट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील उद्योजकांची काय क्षमता आहे, इथे कोणते उत्पादन, पार्ट तयार होतात, याची संपूर्ण माहिती देण्यासाठी एक्‍स्पोमधून मेड इन औरंगाबाद, मेड इन मराठवाडाची स्ट्रेंथ यातून सर्वांना दाखविण्यात येणार आहे. मराठवाड्यातून खऱ्या अर्थाने सीड हब, टेक्‍नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग, देशी-विदेशी प्रॉडक्‍शन, हेरिटेज मराठवाडा हे सर्व यातून दाखविण्यात येणार आहे. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली... 
 
एक्‍झिबिशन सेंटर झाल्यास अनेक प्रश्‍न मार्गी लागणार 

औरंगाबाद, मराठवाड्यासाठी मासिआने महाएक्‍स्पोची परंपरा सुरू केली आहे; मात्र औरंगाबादेत एखादे एक्‍झिबिशन सेंटर झाल्यास अनेक प्रश्‍न सुटतील. उद्योग आणि पर्यटन मिळून आपल्या भागाचा विकास करता येईल. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी नवीन ओळख औरंगाबाद आणि मराठवाड्याला मिळेल, असा विश्‍वास समन्वयक सुनील कीर्दक यांनी सांगितले. 


औरंगाबादसह मराठवाड्याची क्षमता या एक्‍स्पोच्या माध्यमातून बाहेरून येणाऱ्यांना कळेल. याचा फायदा नवीन उद्योग येण्यासाठी होईल. केवळ आठ लोकांपासून सुरू झोलला एक्‍स्पोचा प्रवास आज 450 उद्योजकांच्या सहभागात झालेला आहे. याच एक्‍स्पोमधून पुढील तीन वर्षांनी होणारी एक्‍स्पोची घोषणाही केली जाणार आहे. पुढील एक्‍स्पो हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा आमचा मानस असेल. 
ज्ञानदेव राजळे, अध्यक्ष मसिआ 

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या एक्‍स्पोप्रमाणे हा एक्‍स्पो होणार आहे. यात वेगवेगळ्या क्षेत्रांचे वेगवेगळे डोम केले आहेत. यातून वेगवेगळे सेगमेंट्‌स यात होणार आहे. युवकांसाठी संवाद सत्र असणार आहे. चांगल्या दर्जाचा हा एक्‍स्पो असणार आहे. 
अभय हंचनाळ, उपाध्यक्ष, मसिआ चिकलठाणा चॅप्टर 
-------- 
लघुउद्योजक एकत्र आल्यावर काय करू शकतात हे यातून दिसणार आहे. मराठवाड्याचा विकास होण्याचा प्रयत्न राहणार आहे. यातून मराठवाडा मागास नाही हे दाखविण्याचाही प्रयत्न राहील. यातून बाकीचे उद्योग इथे घेऊन रोजगारनिर्मिती व्हावी, ऑरिक सिटीत उद्योग यावेत, हा उद्देश आहे. औरंगाबादला इंडस्ट्रीयल नगरी होण्याची ही नामी संधी आहे. 
अर्जुन बी. गायकवाड, सचिव, मसिआ. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT