auto.jpg
auto.jpg 
छत्रपती संभाजीनगर

क्या बात है ! लॉकडाऊननंतर 'हे' शहर घेतयं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये उभारी, एकाच दिवशी करोडोंची उलाढाल 

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रांतील उलाढाली ठप्प होत्या. लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयासह महत्वाचे सणाही अत्यंत साध्या पद्धतीने साजरे झाले. त्यामुळे याकाळात वाहन विक्री झालीच नाही. तर अनलॉक झाल्यानंतर देखील पाहिजे तसा प्रतिसादही मिळत नव्हता. तर आता गणेशोत्सवाच्या सुरूवातीलाच वाहन विक्री सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरात शंभर ते दीडशे दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री झाली, अशी माहिती विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांनी दिली आहे. 

दसरा, दिवाळी, पाडवा व गणेशोत्सवासह सणाला वाहन खरेदी शुभ मानली जाते. यंदा कोरोनाने सर्वच क्षेत्र प्रभावित झाले. लॉकडाऊनमुळे चार महिन्यांहून अधिक काळ वाहन मार्केट ठप्प होते. उद्योग, व्यवसाय, कारखान्याने ही पूर्ण क्षमतेने अद्यापही सुरू झालेले नाही, त्यामुळे त्यात काम कर्मचाऱ्यांचा रोजगार अद्यापही पुर्वरत झालेला नाही. यामुळे वाहन खरेदीवर मोठा परिणाम जाणवेल असे तज्ञांतर्फे सांगितले जात होते. अनलॉक झाल्यापासून हळूहळू ग्राहक वाहन खरेदीकडे वळू लागले आहेत. यात प्रामुख्याने लहान वाहनांची विचारणा होत आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरातील १०० हून अधिक चारचाकी व दुचाकी विक्री झाली असल्याची माहिती धूत मोटर्सचे व्यवस्थापक विकास वाळवेकर यांनी सांगितले. 

ऑटोमोबाइल क्षेत्रात गेल्या चार महिन्यांपासून मोठी उलाढाल झालेली नव्हती, मात्र गणेश चतुर्थीपासून या क्षेत्रातही नवचैतन्य आले आहे. चारचाकी, दुचाकीच्या बुकिंग तसेच चौकशी वाढली आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या दसरा-दिवाळी वाहन बाजारपेठेसाठी चांगले राहील असेही ही वाहन विक्रेत्यांतर्फे सांगण्यात येत आहे. सध्या वाहन विक्री ४० टक्के सुरू झाली आहेत. यंदा पाऊसही चांगला असल्यामुळे दसरा दिवाळीला वाहन मार्केट उसळी घेईल असा विश्वासही विक्रेत्यांतर्फे व्यक्त केला जात आहे. 

कंपन्यांची ऑफर्स, बँकांची व्याजदर घट 
वाहन विक्री वाढावी यासाठी नामवंत कंपन्यांतर्फे चारचाकी वाहनांवर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आले आहे. यामुळे ग्राहक आकर्षित होत वाहन खरेदी करावीत, याच उद्देशाने या ऑफर्स देण्यात आले आहेत. 
हे ऑफर्सचा फायदा ग्राहक घेताना दिसत आहे. यासह बँकांतर्फे ही वाहन कर्जावर व्याज दरात एक ते दीड टक्का घट केली आहे. याचाही फायदा ग्राहकांना होणार आहेत.काही ग्राहक दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने आता वाहनांची बुकिंग करीत आहे. अनेकजण नवनवीन वाहनांची चौकशी करत आहे. वाहन बाजारात आलेली मंदी हळुहळु ओसरताना दिसत आहे. 

वाहन बाजारपेठे हळूहळू पूर्वपदाकडे येत आहे. लॉकडाऊन नंतर चारचाकी वाहनांची ४० टक्के, तर दुचाकी विक्री २० टक्क्यांवर आहे. ग्राहकांमध्ये लहान वाहनांची मागणी आहे. यात नव्याने येणाऱ्या चारचाकीचीही विचारणा होत आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर १०० हून अधिक चारचाकी वर दुचाकींची विक्री झाली आहे व यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे आगामी दसरा दिवाळी ही ऑटोमोबाईल क्षेत्रात चंगली राहणार आहे. 
- विकास वाळवेकर, व्यवस्थापक, धूत मोटर्स

(संपादन- प्रताप अवचार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT