Aurangabad Corona News 
छत्रपती संभाजीनगर

'होम आयसोलेशनमधील रुग्णांची योग्य देखभाल आवश्यक, खासगी रुग्णालयाच्या दरावर नियंत्रण ठेवा'

मधुकर कांबळे

औरंगाबाद : वाढत्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशनमधील रुग्णांची योग्य देखरेख आवश्यक आहे. यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच खासगी रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेल्या दरातच उपचार झाले पाहिजेत. यासाठी या दरावर नियंत्रण ठेवावे अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख तसेच मध्य प्रदेश जनऔषध विभागाचे सहप्राध्यापक डॉ. अभिजीत पाखरे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता.आठ) आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत केंद्रीय पथक प्रमुख डॉ. पाखरे बोलत होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.विजय वाघ, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, घाटीच्या डॉ.वर्षा रोटे यांच्यासह सर्व संबंधित प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


डॉ.पाखरे यांनी प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कोवीडच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने योग्य पध्दतीने केले तर निश्चितच संसर्ग वाढ थांबविता येईल. त्यादृष्टीने जनजागृती करुन लोकांकडून नियमांचे पालन प्रभावीरित्या करुन घेण्यात यावे. तसेच कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणे गरजेचे असून होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या उपचाराबाबत योग्य पद्धतीने देखरेख होणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या. खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक आहे. लसीकरण मोहीमेची माहिती घेऊन अधिक व्यापक प्रमाणात चाचण्या आणि लसीकरण मोहीमेची अमंलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. 


जिल्हाधिकारी चव्हाण यांनी उपाययोजना बाबतची सविस्तर माहिती दिली. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात २६, तर ग्रामीण मध्ये ७८ कन्टेनमेंट झोन केले आहेत. तसेच कोरोना उपचार सुविधात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असून १८२ उपचार सुविधा सध्या उपलब्ध असून २० हजार खाटांची व्यवस्थासह वाढीव उपचार सुविधांमध्ये पूरक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून १०४ केंद्रावर चाचण्यांची सुविधा आहेत. तसेच लसीकरण केंद्रातही वाढ करण्यात आली असून १३३ केंद्रावर लसीकरण केल्या जात असल्याचे सांगून पर्याप्त प्रमाणात जिल्ह्यात ऑक्सिजनसाठा, रेमडेसिवीर औषध उपलब्ध असून त्याचप्रमाणे कोवीड नियमावलीचे प्रभावी पालन करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच बरोबर शनिवार,रविवार या दोन दिवशी कडक लॉकडाऊनचे यशस्वी पालन केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. 


डॉ. गोंदावले म्हणाले ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपचार सुविधा, कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येत असून ग्रामीण मध्येही खासगी सीसीसी, होम आयसोलेशनची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मोठ्या संख्येने खाटांची संख्या वाढवण्यात येत असून त्याला पर्याप्त अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. तसेच नियोजन आणि समन्वयपूर्वक स्थानिक यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवल्या जात असल्याचे सांगून डॉ. गोंदावले यांनी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील संर्सग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली.  डॉ. लाळे यांनी औरंगाबाद जिल्ह्याने “ माझे आरोग्य माझ्या हाती” या ॲपची सुरवात केली. दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या, शनिवार व रविवार कडकडीत लॉकडाऊनसह अनेक नाविन्य पूर्ण उपाययोजना राबवून वाढता संर्सग वेळीच रोखण्यासाठी राबवलेल्या उपायांची व उपचार सुविधांबाबत माहिती दिली.  

Edited - Ganesh Pitekar

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT