Nagad Group Gram Panchayat Sarpanch And Vice Sarpanch Appointment 
छत्रपती संभाजीनगर

माजी आमदार नितीन पाटलांच्या गटाचे राजधर अहिरे नागदचे सरपंच, तर गीता महाजन उपसरपंच

मनोज पाटील

नागद (जि.औरंगाबाद) : नागद (ता.कन्नड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजधर अहिरे, तर उपसरपंचपदी गीताबाई महाजन यांची निवड सोमवारी (ता.आठ) झाली. यावेळी सरपंच व उपसरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाल्यानंतर गुप्त मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी माजी आमदार नितीन पाटील व डॉ.दिलीपसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आदर्श परिवर्तन विकास पॅनलच्या आठ जागा निवडून आले होते.

तसेच आमदार उदयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वा खालील जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या पाच जागा निवडून आले होत्या. नागद ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या पांगारा येथील दोन जागा अपक्ष निवडून आल्या होत्या. या दोन अपक्ष सदस्यांना आमदार राजपूत गटाने ऐन वेळी आपल्या बरोबर घेऊन आज अर्ज दाखल केले.

माजी आमदार नितीन पाटील व डॉ.दिलीपसिंग राजपूत गटाकडून सरपंचपदासाठी राजधर प्रकाश अहिरे व उपसरपंच पदासाठी गीताबाई जयरमसिंग महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार राजपूत गटाकडून सरपंचपदासाठी नाना देवराम अहिरे व उपसरपंचपदासाठी अपक्ष म्हणून निवडून आलेले मदनसिंग रुपसिंग लोदवाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

यावेळी गुप्त मतदान पद्धतीने राजधर प्रकाश अहिरे यांना आठ मते मिळून ते विजयी झाले तर नाना देवराम अहिरे यांना सात मतदान मिळाली. त्यांचा एक मताने पराभव झाला. तसेच उपसरपंचपदासाठी गीताबाई महाजन यांना आठ मते मिळून त्या विजयी झाल्या व मदनसिंग रुपसिंग लोदवाळ यांना सहा मते मिळाली व एक मतपत्रिका कोरी निघाली त्यामुळे त्यांचा पराभव झाला. या वेळी ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले पंधरा सदस्य उपस्थित होते.

यावेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून आर.एम.बेंबरे, कृषी अधिकारी पंचायत समिती कन्नड सचिव म्हणून ए.बी.गोरडे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी व्ही.ए. मोतिंगे, ग्रामपंचायतचे लिपिक जयसिंग राजपूत, रवींद्र राजपूत, कोतवाल  शेख इसाक यांनी त्यांना मदत केली. पोलिस बंदोबस्त जमादार पंढरीनाथ इंगळे व पोलीस पाटील दीपक कोळी यांनी केला.


निवड प्रक्रियेत नितीन पाटील गटाचा विजयी घोषित झाल्यानंतर माजी आमदार नितीन पाटील यांचे चिरंजीव अर्जुन पाटील, डॉ.दिलीपसिंग राजपूत यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार करून विजय साजरा करण्यात आला. यावेळी अशोक पाटील, सुभाष महाजन, भगवान ठाकरे, राजेश पाटील, बबलू पाटील, भोला महाजन, रितेश मोरे, अजित महाजन,  जितेंद्र हजारी, भाऊसाहेब  आहिरे, शाहू महिरे, आप्पा कारभारी, विजय पाटील, गिरधर तेवर, राजू गोठवाळ, राजू पाटील  आदींनी फटाके फोडून तसेच गुलाल उधळून व पेढे वाटून विजय साजरा केला. अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitaran PRO Suspended : कोल्हापूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी तडकाफडकी निलंबीत, स्मार्ट मिटर कॅमेरा प्रकरण भोवलं; प्रशासकीय विभागात खळबळ

रोहित शर्माचा BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेचा प्रयत्न अन्...! आगरकरच्या अल्टिमेटमनंतर हालचाल; लॉर्ड्सवर नेमकं काय होणार?

Latest Marathi News Live Update : अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या २ मुलांपैकी एकाचा २४ तासानंतर मृतदेह मिळाला; आणखी एकाचा शोध सुरु

Apple Discount Offer : फ्रीमध्ये मिळतायत AirPods Pro अन् Apple Pencil; 'या' ग्राहकांसाठी ॲपलची स्पेशल ऑफर

Karnataka Covid Cases : महाराष्ट्राशेजारील कर्नाटकात कोरोना रुग्णांमध्ये 10 दिवसात मोठी वाढ; नव्या रुग्णांची नोंद झाल्याने वाढली चिंता, नेमकी काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT