Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत आणखी तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या 102 वर

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात रोजच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. सकाळीच ६४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तोच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या तिन्ही रुग्णांना विविध आजारांनी ग्रासलेले होते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना बळींची संख्या आता १०२ वर पोचली आहे. औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर पाच टक्के (5.064 टक्के ) झाला आहे. खाजगी रुग्णालय प्रशासनाने कळविले की, शनिवारी (ता. सहा ) रात्री दोन व रविवारी (ता. सात ) एकाचा बळी गेला.

यात एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत घाटीत 78, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 23, जिल्हा रुग्णालयात 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात एकूण 102 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

एकीकडे औरंगाबादेत वाढती पॉझिटिव्ह संख्या आणि मृत्यू  प्रमाणाचा आलेख वाढत असला तरी देखील दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 58.78 एवढी आहे. आतापर्यंत 1 हजार 84 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

या रुग्णांचा मृत्यूत समावेश : 

100 वा मृत्यू 
अल्तमश कॉलनी येथील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा शनिवारी (ता. सहा ) रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना 27 मे रोजी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची बाधा आणि इतर व्याधी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत.

101 वा मृत्यू 
कैलासनगर येथील 56 वर्षीय महिलेचा शनिवारी (ता. सहा) जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना चार जूनला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. लक्षणावरून त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

102 वा मृत्यू 
देवडी बाजार येथील 60 वर्षीय महिलेचा एका खासगी रुग्णालयात आज (ता. सात ) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात तीन जून रोजी भरती करण्यात आले होते त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोविडची बाधा आणि अवयव निकामी होणे हे त्यांच्या मृत्यूचे कारण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: निवडणुकीआधी काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; बेस्टच्या कायापालटासाठी मांडली ठोस योजना

Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट

UPI Payment Tips : UPI पेमेंट करताना सावध! या सुरक्षा टिप्स दुर्लक्ष केल्यास खातं होऊ शकतं रिकामं!

Blue Drum : चर्चेतील मेरठ हत्याप्रकरणावर आधारित डॉक्यू-सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Motorola Viral News : मोटोरोला मोबाईल ब्लास्टवर कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT