Aurangabad Latest News 
छत्रपती संभाजीनगर

काम घेऊन आले अन् तिघे निघाले कोरोना पॉझिटिव्ह, ॲन्टीजेन चाचणीशिवाय चार कार्यालयांत 'नो एन्ट्री'

माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून, आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. बुधवारपासून (ता. २४) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून, दिवसभरात तीन जण पॉझिटिव्ह निघाले. दोन रुग्ण विभागीय आयुक्त कार्यालयात तर एक रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयात आढळून आला, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.


शहरात गेल्या सहा दिवसात सुमारे ८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल २४० रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांवर अधिकचे निर्बंध घातले जात आहेत. मंगळवारी (ता. २३) जिल्हाधिकारी सुनील चौधरी, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बैठक घेत आठ मार्चपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी जुनी नियमावली लागू केली. एकाच वेळी दुकानामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देऊ नये, थर्मलगन, ऑक्सीमिटरव्दारे ग्राहकाची तपासणी करावी असे आदेश काढले.

त्याच बरोबर आता सरकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची ॲन्टीजेन पद्धतीची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी महापालिकेचे पथक तैनात करण्यात आले आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह असेल तरच कार्यालयात प्रवेश दिला जाईल. पॉझिटिव्ह आढळून आल्यास तातडीने महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये संबंधिताला दाखल केले जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.


बुधवारपासूनच अंमलबजावणी सुरू
बुधवारपासूनच या चारही कार्यालयात या चारही कार्यालयात तपासणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी २२८ नागरिकांची ॲन्टीजेन पद्धतीने चाचणी करण्यात आली. विभागीय आयुक्तालयात १०० जणांची चाचणी केली असता, दोघे पॉझिटिव्ह निघाले. जिल्हाधिकारी कार्यालयात ३९ जणांची चाचणी केली असता, एक जण पॉझिटिव्ह निघाला. पोलीस आयुक्तालयात २० जणांची तर महापालिकेत ६९ जणांची चाचणी करण्यात आली.

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनेकांनी ठोकली धूम
या चारही कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्यांची मोठी संख्या असते. त्यातून संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी चारही कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर तपासणी सुरू होताच अनेकांनी कार्यालयात न येता माघारी फिरणेच पसंत केले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics : दिल्लीची पुनरावृत्ती की नवी खेळी? 'थलपती'च्या TVK ला पाठिंबा देताना काँग्रेस पुन्हा तीच मोठी चूक करतेय? पक्षासाठी ठरणार धोक्याची घंटा?

Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Jammu Kashmir Prepaid SIM Rules : जम्मू-काश्मीरमध्ये आपलं प्रीपेड सिमकार्ड का चालत नाही? 99% लोकांना माहिती नाही, 'हे' आहे कारण

IPL 2026 फायनल अहमदाबादला! बंगळुरूने मान गमावला, play off चं वेळापत्रक जाहीर

"तासन् तास श्वासावर नियंत्रण ठेवून..." 'राजा शिवाजी' सिनेमातील कठीण अंडरवॉटर सीनचा अभिनेत्रीने सांगितला अनुभव

SCROLL FOR NEXT