zp paishad gate.jpg
zp paishad gate.jpg 
छत्रपती संभाजीनगर

४८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतन वाढ रोखली ! सुड भावनेने घडला प्रकार !

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : कोरोना महामारीमध्ये ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील तब्बल ४८ वैद्यकीय अधिकारी तसेच काही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी प्रभारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सूड भावनेने रोखल्या असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच प्रभारी असतांनाही धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. परंतु डॉ. गंडाळ यांनी एका तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार कसलीही तक्रार नसतानाही काढून घेतला आणि मर्जीतील अधिकाऱयाकडे तालुका वैद्यकीय अधिकारी पदाची खिरापत वाटल्याचीही चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. 

आरोग्य विभागातील ४८ वैद्यकीय अधिकारी यांना त्यांच्या वैयक्तिक हक्काच्या वार्षिक वेतन वाढीपासून वंचित ठेवण्याचा घाट घातला गेल्याने प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी गंडाळ यांच्या मेरी मर्जी कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढ सूड भावनेनेच रोखण्यात आल्याचा आरोप नाव न छापण्याच्या अटीवर एका वैद्यकीय अधिकाऱ्यांने सकाळ'शी बोलताना केला आहे. कोरोनायोद्धा म्हणून एकीकडे सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्यांची वार्षिक वेतन वाढ रोखून आर्थिक कोंडी करायची या प्रकाराबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ वार्षिक वेतनवाढी मंजूर कराव्यात अशी मागणीही केली आहे. 

आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्याच्या सूचना : डॉ. गंडाळ 
दरम्यान वैद्यकीय अधिकाऱयांच्या वेतनवाढी रोखण्यात आल्याच्या प्रकाराबद्दल डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी "सकाळ"शी बोलतांना सांगितले की, आरोग्य विभागातील ४१ वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनवाढी शासनाच्या निर्देशानुसार आणि नियमांची पूर्तता न केल्याने रोखण्यात आल्या आहेत.

शासनाच्या २६ जून च्या पत्रानुसार स्थायित्व प्रमाणपत्र, मेडिकल फिटनेस चारित्र्य प्रमाणपत्र तसेच मराठी आणि हिंदी भाषा सुट प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सादर करावे असे पत्र त्यांना दिले असून त्या नंतरच वेतनवाढीची प्रक्रिया केली जाईल असे पत्र सर्वांना दिले असून चर्चा देखील केली आहे असा दावा डॉक्टर गंडाळ यांनी केला आहे.

तर गंगापूर येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदभार तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या सांगण्यावरूनच काढण्यात आला असाही दावा त्यांनी केला आहे. पदभार काढतांना जिल्हाधिकारी यांच्या दूरध्वनी संभाषनानुसार बदलाची कारवाई केली असल्याचा शेराही त्या संचिकेवर आपण लिहिला असल्याची माहिती दिली व  सर्व नियमानुसारच केल्याचा दावाही डॉ. गंडाळ यांनी केला आहे.


(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT