Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

Corona Effect : दुचाकीचे काम; आठशे रुपयात तमाम..! 

अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे सुरु झालेला लॉकडाऊन तब्बल ७५ दिवस चालला. याकाळात दुचाकीचा वापर थांबल्याने दुरुस्तीची कामे निघाली आहेत. यासाठी शंभर रुपयांपासून ते साडेचार हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. यातही समाधानाची बाब म्हणजे, बहुतांश कामे सरासरी आठशे ते एक हजार रुपयातच तमाम होत आहेत. 

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारची वाहतूक बंद होती. दरम्यान, अनेकांच्या दुचाकी घरी पार्कींग मध्ये उभ्या होत्या. त्यामुळे स्पार्क प्लग तसेच क्लच, ब्रेक, अॉक्सीलेटर केबल कठीण झाल्या आहेत. इतक्या दिवस पेट्रोल टाकीतच असल्याने तेही खराब झाल्याचे प्रकार दुरुस्तीवेळी पहायला मिळत आहेत. काही दुचाकींचे इंजिन काम निघाले असुन पिस्टन खराब झाले आहेत. बॅटरीचेही चार्जिंग उतरले आहे. असे दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांनी सांगितले. 

अनेक गॅरेजची कामे लोकलच्या मेकॅनिकद्वारे सुरु आहेत. बाहेरगावचे मेकॅनिक अजून बोलवण्यात आले नाहीत. दुरुस्तीलाही दोन ते पाच तास लागत आहेत. ग्राहकांचे फोन आल्यास त्यांना वेळ देण्यात येतो. यामुळे शोरुमवाल्यांसारखी छोट्या गॅरेजवाल्यांची अवस्था झाली आहे. याचवेळी कुणी किरकोळ काम घेऊन आल्यास त्यांनाही प्राधान्य द्यावे लागत आहे. 


काम : अंदाजित खर्च 

  • प्लग, ब्रेक : २५० ते ३०० 
  • क्लच, ब्रेक, अॉक्सीलेटर केबल : ३०० ते ३५० 
  • पेट्रोलची टाकी स्वच्छ करणे : १०० ते १५० 
  • बॅटरी (चार्जिंग किंवा बदलणे) : ५० ते ११०० 
  • इंजिन (पिस्टन, हेड, गॅसकीट, फिटींग) : २००० ते २५०० 


लॉकडाऊन काळात डॉक्टर, नर्स यांचे कॉल आले. त्यांना घरी जात सेवा दिली. तसेच अत्यावश्‍यक सेवेतील गरजुंचेही सुमारे दीडशेपेक्षा अधिक कॉल आले. कामगारांसाठी सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था केली आहे. स्पार्क प्लगची कामे लोक घरच्या घरी करु शकतात. तरीही ग्राहकांनी इतर बाबी तपासुन पाहिल्या पाहिजेत. 
 ज्ञानेश्‍वर तांबे (तांबे ऑटो, बजरंग चौक, औरंगाबाद) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT