corona muncipalty.jpg
corona muncipalty.jpg 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना टॉपटेनमधून औरंगाबाद बाहेर, शहरवासियांना दिलासा!  

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद शहर हॉटस्पॉट ठरले होते. मृत्यूदरही सर्वाधिक असल्याने केंद्रीय पथकाने दखल घेत शहरात येऊन पाहणी केली. मात्र आता सात महिन्यानंतर चित्र बदलले असून, राज्यातील दहा शहरातील सक्रिय रुग्णांचा विचार करता, औरंगाबाद त्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. 

कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी स्क्रिनिंग करत सर्वतोपरी खबरदारी घेतली. मात्र शहरात पहिला पहिला रुग्ण १५ मार्चला आढळला. त्यानंतर काही दिवस एक-दोन रुग्ण आढळले. मात्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. पुढील तीन महिने शहरात कोरोना कहर होता. 

जिल्हा देखील कोरोनाने विळख्यात घेतला. दररोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या साडेपाच हजारांपर्यंत गेली. त्यामुळे महापालिकेने अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याचा धडाकाच सुरू केला. त्यामुळे झपाट्याने रुग्ण समोर आले व ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांची संख्या कमी होत गेली. सक्रिय रुग्णांच्या संख्येत राज्यात टॉपटेनमध्ये असलेले शहर आता टॉपटेनच्या यादीतून बाहेर पडले आहे. चार नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ ठाणे शहराचा नंबर आहे. औरंगाबाद शहरात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीनशेच्या खाली आली आहे. 

राज्यातील टॉपटेन जिल्हे 
जिल्हा - सक्रिय रुग्ण 

  • पुणे -२४,८४९ 
  • ठाणे -१६,६६६ 
  • मुंबई -१६,५७६ 
  • नाशिक -५,११७ 
  • नगर -४,७५६ 
  • नागपूर -४,३४२ 
  • सातारा -३,८१३ 
  • चंद्रपूर -३,७२४ 
  • रायगड -३,६९१ 
  • सोलापूर -२,७०६ 

दहा शहरात सक्रिय रुग्णांची संख्या- ८६,२४० 
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या- १,१२,९१२ 

(Edited By Pratap Awachar) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT