Corona Vaccination In Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात, खासगी रुग्णालयात २५० रुपये मोजावे लागणार

मनोज साखरे

औरंगाबाद : शहरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी (ता. एक) सुरूवात झाली. ६० वर्षांपेक्षा अधिक, ४५ वर्ष आणि व्याधीग्रस्त असलेल्यांनाही कोरोना लस शासकीय रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे येथे मोफत देण्यात येणार आहे. खासगी रूग्णालयात २५० रूपये प्रतिव्यक्ती शुल्क आकारण्यात येईल, असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी cowin.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पसंतीनुसार लसीकरण केंद्र निवडता येईल. लस घेण्यासाठी किमान २४ तास अगोदर नोंदणी आवश्यक आहे.

तसेच प्रत्यक्ष नोंदणीही लाभार्थ्याला लसीकरण केंद्रावर करता येईल. नोंदणीवेळी ६० वर्ष वयोगटावरील व्यक्तींनी आधार किंवा वयाचा दाखला सोबत ठेवावा. मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी होईल. त्यासाठी मोबाईल जवळ असणे आवश्यक आहे. एका मोबाईलवर एका घरातील ४ व्यक्ती नोंदणी करू शकतात.
४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्याधीग्रस्त असल्यास नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रमाणपत्र शासनाच्या विहित नमुन्यात आणणे बंधनकारक आहे. केंद्राने २० प्रकारच्या व्याधींची यादी प्रसिद्ध केली आहे. आज पहिल्या दिवशी लसीकरणादरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने इंटरनेट सेवा संथ होती. लस घेण्यासाठी आलेल्या नागरीकांना ताटकळत बसावे लागले.


येथे घ्या लस
- लसीकरणास येणाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यात येईल.
- सद्या सर्व ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण सुरू आहे.
- ज्यांची कोव्हिन ॲपमध्ये नावे नाहीत. त्यांना प्रत्यक्ष नोंदणी करुन लस घेता येईल.
- लस खासगी रूग्णालयांमध्येही घेता येईल. पण २५० रुपये द्यावे लागतील.

वाचा - थरार! काही कळण्यापूर्वीच भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार, उपचारापूर्वीच सोडला जीव

या खासगी रुग्णालयात लसीकरण
काबरा, इंटरनॅशनल, जे.जे.प्लस, सेंच्युरी मल्टीस्पेशालिटी, सावजी मल्टीस्पेशालिटी, संजीवनी चिल्ड्रन, आयकॉन, कृपामयी, उत्कर्ष, निमाई, केअरवेल, डॉ. दहिफळे फाऊंडेशन, एमजीएम, वायएसके, माणिक, लाईफलाईन, सिग्मा, एमआयटी, डॉ. हेडगेवार, बजाज, अल्पाईन, साई कृष्णा, आदर्श सहकारी, साई हॉस्पिटल, पैठण,
श्री.मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, गणपती आयसीयू, फुलंब्री, अजंता मल्टी स्पेशालिटी, सिल्लोड, वाळूज हॉस्पिटल, धूत हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

औरंगाबादच्या ताज्य बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


जिल्ह्यात १ हजार ७३३ जणांचे लसीकरण
औरंगाबाद जिल्ह्यात आज १ हजार ७३३ जणांचे लसीकरण झाले. यात ३१६ ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ४९ वयोगटातील १५९ नागरीकांना लस देण्यात आली. उर्वरित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT