Aurangabad Accident News
Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

दोन जिवलग मित्रांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, गावात चूलच पेटली नाही

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद ) : येथील हाॅटेलात जेवण करुन चौघे जिवलग मित्र कारने गावाकडे येत असतांना वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. पाचोड जवळील लिंबगाव फाट्यानजीक बुधवारी (ता.२३) रात्री झालेल्या या भीषण अपघातात दावरवाडी (ता.पैठण) येथील दोन मित्र जागीच ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी होऊन ते मृत्यूशी झुंज देत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली. या दुःखद घटनेने हादरुन गेलेल्या गावात गुरुवारी (ता.२४) कुणाच्या घरी चूलच पेटली नाही. एकाच वेळी दोघांची अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग ग्रामस्थांसह मृतांच्या नातेवाईकांवर ओढावला. दरम्यान मन विषण्ण करणाऱ्या या अपघाताच्या बातमीने गावातील दैनंदिन व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. (Last Rituals On Two Close Friend At The Same Time In Paithan Taluka Of Aurangabad)

असंख्य नातेवाईक, मित्र मृत तरुणांच्या घरी सांत्वनासाठी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. दावरवाडी येथील अनिल बाबासाहेब कोरडे (वय ३०) ,दत्तात्रय निवृत्ती तांगडे (वय ३३), लतीफ तांबोळी (वय ३०) व सोमिनाथ दहीभाते (वय ४०) हे चौघे जण कारने रात्री काही कामानिमित्त पाचोडला गेले होते. दरम्यान उशिर झाल्याने त्यांनी येथील एका हाॅटेलमध्ये जेवण करुन रात्री साडेनऊ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता अवघ्या तीन किमी अंतरावर पाचोड- पैठण (Paithan) रस्त्यावरील लिंबगाव फाट्याजवळ येताच तीन वाहनांचा विचित्र तिहेरी अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अनिल कोरडे व दत्तात्रय तांगडे यांना जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर लतीफ तांबोळी, सोमिनाथ दहीभाते हे गंभीर जखमी झाले. (Aurangabad)

या दुर्दैवी घटनेची बातमी ही वाऱ्यासारखी गावात पसरली. अन् या अपघाताने गावावर शोककळा पसरली. नातेवाईकांसह मित्रांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी दोघांच्या मृतदेहाची उत्तरणीय तपासणी करण्यात येऊन सकाळी अकरा वाजता दोघांवर शोकाकूल वातावरणात दावरवाडी गावात अंत्यविधी करण्यात आला. सर्व समाजाच्या ग्रामस्थांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून दुखवटा पाळला. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी चुली देखील पेटवल्या नाही. मृतांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश, हंबरडा अन हुंदके हे मनाला हेलावणारे होते. दोघा मित्रांवर एकाच वेळी अखेरचा निरोप देण्याची वेळ गावकऱ्यांवर आल्याने त्यांचेही डोळे पाणवले होते. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यविधीसाठी गावात प्रथम जनसागर उसळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

SCROLL FOR NEXT