Jmd sir Gitte nb 1.jpg
Jmd sir Gitte nb 1.jpg 
छत्रपती संभाजीनगर

महावितरणच्या तक्रारींचे निवारण चोवीस तासांत 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद :  यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळेच पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशा सूचना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. बी. गित्ते यांनी बैठकीत दिल्या आहेत. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. बी. गित्ते यांनी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. येत्या महिनाभरानंतर पावसाचा खंड पडल्यास व आगामी रब्बी हंगामात पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी पंपांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. आगामी काळात ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढणार आहे. उपलब्ध नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून ठेवावेत.

खंडित वीजपुरवठ्यांच्या तक्रारी, वीजबिलाच्या तक्रारी, वीजबिल वसुलीची न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे, कृषी पंपांना उच्चदाब वितरण प्रणालीतून वीजजोडण्या, प्रलंबित वीजजोडण्या देणे आदी प्रश्न सोडविण्याच्या सूचना डॉ. गित्ते यांनी दिल्या. वीज ग्राहकांच्या वीजपुरवठ्यासंबंधी तक्रारींचा निपटारा २४ तासांत करावा, न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच, अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण मंच, लोकअदालतमधील प्रलंबित प्रकरणे; तसेच वीजबिलांची प्रकरणे न्यायालयीन कामकाज सुरू होताच निपटारा करावा; तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका यांच्या पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीजबिलाची थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला मुख्य अभियंता भुजंग खंदारे, लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रामदास काबंळे, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, प्रभारी महाव्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली, उपमहाव्यवस्थापक प्रवीण बागूल, उपमहाव्यवस्थापक कांचन राजवाडे, विधी सल्लागार सत्यजित पवार, अधीक्षक अभियंता रतन सोनुले, मोहन काळोगे यांची उपस्थिती होती. 

Edit Pratap Awachar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT