Mahavitran
Mahavitran 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : वीजबील वसुली पडली महागात, महावितरणच्या पथकावर भिरकावले दगड

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महावितरण कंपनीचे (Mahavitaran Company) तीन पथके संजयनगर, मुकुंदवाडी भागात वेगवेगळ्या गल्लीत कारवाई करीत असतानाच दोघांनी पथकांवर दगड भिरकावले आणि हुसकावून लावले. हा मंगळवारी (ता.११) सकाळी घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अशोक भातकुडे आणि रामेश्वर निकाळजे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार विजय गणेश काथार (वय ३९, रा. म्हसोबानगर, हर्सूल) हे चिकलठाणा (Aurangabad) उपविभागात सहायक अभियंता म्हणून एक वर्षापासून कार्यरत आहेत. ते मुकुंदवाडी विभाग सांभाळतात. मंगळवारी काथार यांच्यासोबत (Aurangabad Crime Update) तीन कर्मचारी, सहायक अभियंता शाम मोरे आणि त्यांच्यासोबत तीन कर्मचारी आणि सहायक अभियंता शरद ढाकणे यांच्यासोबत तीन कर्मचारी असे तीन पथके करुन संयजनगरात कारवाईसाठी गेले.(Stones Pelting On Mahavitaran Squads In Aurangabad)

दहा वाजेच्या सुमारास ढाकणे हे गल्ली क्र. १५ मध्ये कारवाई करीत असताना आरोपी रामेश्वर निकाळजे व अशोक भातकुडे त्यांच्याकडे गेले. त्यांनी लगेचच येथून निघून जा नसता गल्लीतून बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी देत दगड घेऊन त्यांच्यावर भिरकावले. ते बाहेर पडताच आरोपींनी शाम मोरे यांच्या पथकाकडे मोर्चा वळविला. त्यांना गल्ली क्र १४ मधून हुसकावले. त्यानंतर आरोपी काथार यांच्या पथकाकडे गल्ली क्र. २१ मध्ये गेले. त्यांना धक्काबुक्की करुन मीटर जप्ती करण्यापासून रोखले. तसेच, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप वाघ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT