Shendra MIDC 
छत्रपती संभाजीनगर

ज्वलनशील केमिकल्समुळे मिनिडोअरसह दोन दुचाकी आगीत भस्मसात, शेंद्रा एमआयडीसीतील घटना

संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : फायबर डोअर्स बनविण्यासाठी आवश्यक असलेले ज्वलनशील केमिकल्स भरून आणलेल्या रिक्षास लागलेल्या आगीत रिक्षासह दोन दुचाकी आगीत पूर्णपणे खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता.१९) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसीमधील 'ए' सेक्टरमध्ये घडली. या आगीत रिक्षा, दुचाकी व केमिकल्स मिळुन सुमारे चार-पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 


शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सेक्टर 'ए' मधील प्लॉट नंबर पीएपी आय/२ मध्ये जय तुळजाभवानी फायबर डोअर्स वर्क्स  कंपनी आहे. या फायबर डोअर्ससाठी फायबर ग्लास रेग्झीन नावाचे केमिकल्सची गरज असते. हे ज्वलनशील असलेले केमिकल्स घेऊन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक रिक्षा (एमएच १७ बीवाय ५९२३) या कंपनीत आली होती. उतरून घेण्यास वेळ असल्याने सदरील वाहन कंपनीसमोरील मुख्य रस्त्यावरच उभे होते.

सायंकाळी सहा-सव्वासहा वाजेच्या सुमारास मिनिडोअर चालक गाडी कंपनीच्या आत घेत असतानाच गाडीच्या कॅबिनमधील वायरमध्ये अचानक शॉटसर्किट होऊन धुर निघाला. दरम्यान, रिक्षात असलेल्या केमिकल्समुळे काही कळायच्या आतच आगीचा भडका उडाला व या आगीने रिक्षालगत उभ्या असलेल्या दोन दुचाक्यांनाही आपल्या कवेत घेतले. 

शेंद्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. यावेळी, पाण्यासोबतच फोमचा वापर करून पाऊण तासात आग आटोक्यात आली. तथापि, तोपर्यंत तीनही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली होती. यासाठी विभागीय अग्निशमन अधिकारी भरत कापसे यांच्या मार्गदर्शनात उपअग्निशमन अधिकारी दिलीप माने, प्रमुख अग्निशमन विमोचक संदीप पाटील, मधुकर टालोत, डी.एस.सोनवणे , प्रशांत कातकडे आदींनी ही आग आटोक्यात आणली. 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT