छाया पवार
छाया पवार 
मराठवाडा

तहसीलदाराला भोवली रेड झोनमधून ये-जा

आनंद इंदानी

बदनापूर (जि. जालना) -   मुख्यालयी न राहता रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबादेतून ये-जा करणे, वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये कोरोनाबाबतचे अहवाल सादर न करणे, शासकीय कामांत दुर्लक्ष करणे आदी ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार छाया पवार यांच्यावर गुरुवारी (ता.३०) निलंबनाची कारवाई केली आहे. 

बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांनी कोव्हिड-१९ या आपत्ती कालावधीमध्ये मुख्यालयी राहणे आवश्यक असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून ये-जा केली. विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये सादर न करणे, शासकीय कामात अक्षम्य दुर्लक्ष करणे, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष करणे, अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अनधिकृत वाळूसाठे व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे, शासकीय वसुलीबाबत दुर्लक्ष करणे आदी ठपकादेखील ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व कारणांमुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुरुवारी निलंबित केले असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. श्री. पवार यांना निलंबनाच्या काळात जालना येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय मुख्यालय म्हणून देण्यात आले आहे. तर पुढील आदेशापर्यंत बदनापूर तहसीलदार पदाचा कार्यभार जालना कार्यालयातील नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

यासंदर्भात तहसीलदार छाया पवार म्हणाल्या की, माझ्या सासूबाई आजारी असल्यामुळे मला अपडाऊन करावे लागत होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. मात्र माझी रजा मंजूर करण्यात आली नाही. अद्याप मला निलंबनाचे पत्र मिळालेले नाही. निलंबन केल्यावर कुणाला तरी पदभार सोपवावा लागणारच आहे, त्यापेक्षा माझी रजा मंजूर करावयास हवी होती, असे स्पष्ट केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT