Bapurao Patil And Osmanabad District Cooperative Bank Election
Bapurao Patil And Osmanabad District Cooperative Bank Election  esakal
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालकपदी बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड !

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या (Osmanabad District Cooperative Bank Election) निवडणुकीत महाविकास आघाडीचे बापूराव माधवराव पाटील यांची सोमवारी (ता.३१) बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सध्या सूरू आहे. जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढण्याच्या तयारीत असतानाच उमरगा (Umarga) तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे (Congress Party) बापूराव पाटील (Bapurao Patil) यांचा एकमेव अर्ज राहिल्याने सोमवारी स्पष्ट झाल्याने निवड बिनविरोध निश्चित आहे. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पाटील २००९ मध्ये प्रथम जिल्हा बँकेचे संचालक व अध्यक्ष झाले. मध्यंतराचा एक वर्षाचा कालखंड सोडला २००९ ते २०१५ पर्यंत अध्यक्ष राहिले आहेत. मागच्या पाच वर्षातही ते संचालक होते.परत एकदा त्यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे. (Bapurao Patil Elected As Director Of Osmanabad District Cooperative Bank, But Official Announcement Still Not)

दरम्यान यापूर्वी जिल्हा बँकेला उर्जीतवस्था आणण्याचे काम पाटील यांनी केले आहे. याच कालखंडात बँकेचे एनपीए कमी करण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला आहे. पाटील यांचे वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. बँकेच्या व्यवहाराचे उत्तम ज्ञान असल्यामुळे येणाऱ्या काळात बँकेला निश्चितच चांगले दिवस येतील असा आशावाद कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पाटील यांची बिनविरोध निवड होत असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बँकेवर महाविकास आघाडी पूर्णपणे बहुमताने सत्ता स्थापन करेल असे कार्यकर्त्यांना वाटते. (Osmanabad)

कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

पाटील यांची जिल्हा बँकेवर संचालक म्हणुन बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने उमरगा शहरात राष्ट्रीय महामार्ग, शिवाजी चौक व कॉंग्रेस समिती कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. एम.ओ. पाटील, विजय दळगडे, संगीताताई कडगंचे, वशीम शेख याकुब लदाफ, परमेश्वर टोपगे, कुमार पवार, सोहेल इनामदार, खालिद शेख, आयुब जमादार, जीवन सरपे, सुभाष घोडके, प्रदीप गिरीबा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा बँकेवर संचालक म्हणून काम करताना नेहमीच शेतकरी, सभासद व कर्जदार यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी व बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. यापुढेही आम्ही सकारात्मक प्रयत्न करू.

- बापुराव पाटील, संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT