Tuljapur pooja.jpg
Tuljapur pooja.jpg 
मराठवाडा

तुळजापूरात भवानी तलवार अलंकार महापूजा 

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा शुक्रवारी (ता. २३) बांधण्यात आली होती. 

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रानिमित्त सातव्या माळेस शुक्रवारी सकाळी तुळजाभवानी मातेचे नित्योपचार पूजा झाली. त्यानंतर तुळजाभवानी मातेस सर्वोत्कृष्ट दागदागिन्यांचा पेहराव करण्यात आला. सकाळी आठ वाजता भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाची पूजा बांधण्यात आली होती. 

सोमवारपर्यत विविध कार्यक्रम  
तुळजाभवानी मातेच्या मंदीरात उद्या (ता.24) पूर्णाहुती होणार आहे. तसेच रविवारी (ता. 25) रोजी घटोत्थापन होणार आहे. सायंकाळी साव॔त्रिक सिमोल्लंघन होणार आहे. सोमवारी (ता.26) पहाटे तुळजा भवानी मातेचे सिमोल्लंघन होणार आहे. 

पूर्णाहुती सोहळा आज 
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी (ता. २४) सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पूर्णाहुती सोहळा होणार आहे. मध्यरात्री दोन वाजता या सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. 

पोलिस प्रशासन हतबल 
शहरातील आर्य चौकात आलेल्या भाविकांना तेथील पोलीस कम॔चारी रावळ गल्ली मार्गे भवानी रस्त्यावर पाठवत होते. विशेष म्हणजे भाविक ओटीचे साहित्य घेऊन भवानी रस्त्यावर येत होते. प्रशासनाने हद्दीबाहेरच भाविकांना येऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यास कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासन अपयशी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यास कोण जबाबदार असाही प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जात होता. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT