Murder esakal
मराठवाडा

Hingoli : डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून,औंढ्यातील धक्कादायक घटना

कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील एका तरुणाचा डिग्रस कऱ्हाळे शिवारामध्ये शेतात दगड डोक्यात घालून व काठीने मारहाण करून खून झाल्याची घटना रविवारी (ता.२३) उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातील सावळी येथील सचिन धवसे (वय २५) हा तरुण शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. रविवारी सकाळी सावळी ते डिग्रस कऱ्हाळे शिवारात एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला. सावळी येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदरील मृतदेह सचिन याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने औंढा नागनाथ पोलिस ठाण्याला दिली. (Brutally Killed Youth In Aundha Nagnath Taluka Of Hingoli)

औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकाने घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत माग काढला. घटनास्थळी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता मृत सचिन याचा डोक्यात दगड घालून तसेच काठीने मारहाण करून खून (Hingoli) झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला तातडीने ताब्यात घेतले तर अन्य दोघे जण फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्यात मोठी घसरण! 21 दिवसांतील नीचांकी दर; उच्चांकापेक्षा तब्बल ₹23,500 कमी; आजचा ताजा भाव पाहा

Sankashti Chaturthi 2026: 3 वर्षांनी जुळून आलाय दुर्मिळ विभुवन योग! बाप्पाच्या कृपेने मेषसह ‘या’ 2 राशींचं नशीब अचानक चमकणार, होणार धनलाभाचा वर्षाव!

Khan Sir Patna Controversy : कोचिंग सेंटर बाहेर गोळीबाराच्या आरोपावरुन खान सरांचा यु-टर्न; नेमकं काय घडलं? सांगितले सत्य

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीतून माघारीसाठी रात्री उशिरापर्यंत उदय सामंत यांची खलबते

Dudh Halwa: फक्त मिठाई नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा! ललितपूरच्या 'दूध हलव्या'ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन!

SCROLL FOR NEXT