Chatting with woman and taking one lakh two accused arrested from Aurangabad  
मराठवाडा

महिलेशी चॅटिंग करीत सव्वा लाख उकळले; चोवीस तासात औरंगाबादेतून दोघांना अटक

हरी तुगावकर

लातूर : एका महिलेशी मोबाइलद्वारे संभाषण व चॅटिंग करीत एक लाख १६ हजार ५०० रुपये उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी २४ तासांत औरंगाबाद येथून अटक केले. याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

येथील एका महिलेशी अनोळखी व्यक्तीने तिचा मित्र असल्याचे भासवले. तिच्या सोबत चॅटिंग करून प्रेमाचे नाटक करीत विश्वास संपादन केला. दवाखान्यात अॅडमिट असल्याचे सांगून ता. १६ ऑगस्टला पैशाची मागणी केली. शिवाय पतीला घटस्फोट दिल्यानंतर सांभ‍ळण्याची ग्वाहीही त्याने दिली; तसेच औरंगाबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औरंगाबाद येथील खाते नंबर देऊन पैसे टाकण्यास सांगितले. संबंधित महिलेने ता. २० ऑक्टोबरला त्या खात्यावर एक लाख १४ हजार ५०० रुपये टाकले. ही रक्कम टाकल्यानंतर कॉल करून ‘तू समजतेस तो मी तुझा मित्र नाही. माझे खरे नाव मी तुला सांगणार नाही. तू मला दिलेल्या पैशांबद्दल कोठे तक्रार केलीस तर तू माझ्या सोबत मोबाईलवर केलेले व्हॉट्सअॅप चॅटिंग व वैयक्तिक संभाषण प्रसारित करून तुझी बदनामी करीन. तुझ्या वडिलांना येऊन मारहाण करीन’, अशी धमकीही त्याने दिली. 

तसेच वारंवार फोन करून या महिलेला प्रेम कर म्हणून शिवीगाळही केली. त्यानंतर महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी कोण आहे हे माहिती नव्हते. त्यामुळे तपास करणे अवघड होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, डीबी पथकाचे कर्मचारी गनी शेख, युवराज गिरी, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार राजेश कंचे, गणेश साठे यांनी सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने औरंगाबाद येथील धूत रुग्णालयाच्या समोर राहणारे रूपेश दगडू जाधव (वय २७, रा. म्हाडा कॉलनी), आणि अजय शिवराम निलाखे (वय ३१) या दोन संशयितांना अटक केली. या पैशातून त्यांनी खरेदी केलेली दुचाकी व गुन्ह्यात वापरलेले मोबाईलही जप्त केले आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT