File photo
File photo 
मराठवाडा

‘या’ जिल्ह्यात गर्भवती महिलांना धान्य वाटपाचे पोषण 

नवनाथ येवले

नांदेड :  गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे या उद्देशाने शासनाकडून गर्भवती महिलांना सकस व पोषण आहाराचा लाभ दिला जात आहे. महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील १८ हजार ७७६ गर्भवती महिलांना पोषण आहार घरी तयार करुन घेण्यासाठी अंगणवाडी स्तरावर गहू, चवळी, मसुर या धान्यासह मिरची, सोयाबीन तेल, हळद, मिठ या सहित्याचे वाटप करण्यात येत आहे. 
अंगणवाड्यांमधील बालके, गर्भवती महिला व कुपोषित बालकांना टेक होम रेशन (टीएचआर) योजनेअंतर्गत सकस व पोषक आहाराचा लाभ दिला जातो. शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत २००९ मध्ये या योजनेची अंंमलबजाणी करण्यात आली. गर्भवती महिला व बालकांना तयार सकस आहार मिळावा या उद्देशाने सुरवातीला पिशवीबंद पॉकीटद्वारे कंत्राटदार कंपनीद्वारे अंगणवाडीस्तरावर आहार पुरठा करण्यात आला. मात्र, पिशवीबंद पोषण आहाराची पॉकीटे खाण्यायोग्य नसल्याने जनावरांच्या दावणीला जात असल्याच्या तक्रारींनी स्थानिक प्रशासनाच्या नाके नऊ आले होते. 

१८ हजारावर महिलांना योजनेचा लाभ                                              दरम्यान अंगणवाड्यामधील सहा महिने ते तीन वर्षांच्या बालकांना मिळणाऱ्या पिशवीबंद सकस अन्नाच्या दर्जाबाबत पद्धती बदलण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार एप्रील २०१९ पासुन गर्भवती महिलांना सकस व पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी प्रती महिलेस प्रतिदिनी ६६ व ८५ ग्रॅम गव्हाचे प्रमाण ठरवून त्यासोबत मसूर, चवळी या कडधान्यासह हळद, मिठ, मिरची साहित्याचा टीएचआर योजनेत समावेश केला. त्यानुसार जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाडी क्षेत्रातील १८ हजार ७७६ गर्भवती मातांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

गर्भवती महिलांच्या पोषणाला मिळतेय बळकटी                                    निकषा नुसार गर्भवती महिलेची तीसऱ्या महिण्यात योजनेसाठी नोंद करुन चौथ्या महिण्यापासून योजनेचा लाभ दिला जातो. गर्भवती महिलनां याेजने अंतर्गत मिळणाऱ्या धान्य, साहित्याचा सकस आहारामध्ये नेटाने वापर व्हावा या उद्देशाने दोन महिन्याच्या कोट्याचे एकदम वाटप करण्यात येतो. 
पूर्वीच्या पिशवीबंद आहाराच्या तुलनेत अंगणवाडी स्तरावर मिळणारे धान्यादी साहित्यांमुळे गर्भवती महिलांना आता थेट घरी सकस आहार बनवता येत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान तीसऱ्या महिण्यात नोंदीनंतर गर्भवती महिलेस प्रसुतीपर्यंत या योजनेचा लाभ मिळत असून प्रसुतीसाठी स्थलांतरीत महिलेस ज्या त्या ठिकाणच्या अंगणवाडीतून लाभाचे सक्त आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे पिशवी बंद सकस आहाराच्या तुलनेत थेट मिळणाऱ्या टीएच आर धान्य वाटपातून गर्भवती महिलांच्या पोषणाला बळकटी मिळत आहे. 

हेही वाचा नांदेड एक्स्ट्रा ‘टॉनीक’ देणारे शहर
 
योजनेअंतर्गत धान्य, साहित्याचे प्रमाण (दोन महिण्यासाठी) 
गहू -  तीन किलो ७७५ ग्रॅम पॉकीटे (एक किंवा दोन) 
चवळी - एक किलो 
मसुर - ९५० ग्रॅम 
सोयाबीन तेल - ५०० ग्रॅम 
मिरची पावडर - २०० ग्रॅम 
हळद - २०० ग्रॅम 
मिठ - ४०० ग्रॅम 
 
तालुकानिहाय गर्भवती महिलांची संख्या 
तालुका- संख्या 

अर्धापुर - ६१६
 भोकर- ७७३
बीलोली-१००१ 
देगलूर- १४४२
धर्माबाद- २४६
हदगाव -१९३५
हिमायतनगर- ९७४
कंधार- १६१९
किनवट- १६५४
लोहा- १६७१
माहूर- ७०५
मुदखेड- ६४३
मुखेड-१९७०
नायगांव- १३०१
नांदेड-१५५१
उमरी- ६७५

उद्देश साध्य होत आहे. 
अंगणवाडी स्तरावर गर्भवती महिलांना टीएचआर योजने अंतर्गत मिळणारा पोषण आहार महिला घरी बनवून आवडीने खात असल्यामुळे योजनेचा उद्देश साध्य होत आहे. 
- एस.व्हि. शिंगणे ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी - महिला व बालकल्याण) 
 

पोषक आहार आवश्यकच
गर्भवती महिलेस पुरक व पोषक आहार मिळणे अवश्यक आहे, त्यामुळे गरोदरपनामध्ये आवश्यक दहा ते १२ किलो वजनात वाढ होते. मातेचे वजन वाढले तर सदृढ बाळ जन्मास येते. 
- डॉ. बालाजी शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी) 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT